अपघात
ट्रक-मोटारसायकल भीषण अपघात,तीन ठार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील खिर्डी गणेश ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या नगर-मनमाड महामार्गावर आज दुपारी ०३ वाजेच्या सुमारास येवल्याकडे जाणारा एक राजस्थानचा ट्रक (क्रं.आर.जे.१४ जे.एस.३४६८) व बजाज सी.टी.१०० (क्रं.एम.एच.४१ जे.२४५१) दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकी वरील अज्ञात तरुण (वय-३५) व त्यावरील महिला (वय-२८) व एक लहान दीड वर्षाची मुलगी असा तिघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

नगर-मनमाड महामार्गावर येवल्याकडे वरील क्रमांकाचा ट्रक जात असताना त्याने खिर्डी गणेश हद्दीत समोरून येणाऱ्या वरील क्रमांकाच्या दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले आहेत.त्यात एक तरुण,त्याची बहुदा पत्नी व त्यांची एक चिमुकली मुलगी असा तिघांचा समावेश आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”शिर्डी जवळ असलेल्या सावळीविहिर फाटा ते इंदोर या राष्ट्रीय मार्गावर सध्या काम प्रगतिपथावर असून सदर रस्ता अरुंद ठरत असल्याने या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु असल्याचे दिसून येत आहे.त्यात अनेक नागरिकांचा बळी जात असून वित्तीयहानी मोठ्या प्रमाणावर होत आहे.गत सप्ताहात उंदीरवाडी येथील दोन जण ठार झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक भीषण अपघात आज दुपारी ०३ वाजेच्या सुमारास झाला आहे.
यात येवल्याकडे वरील क्रमांकाचा ट्रक जात असताना त्याने समोरून येणाऱ्या वरील क्रमांकाच्या दुचाकीस जोराची धडक दिली आहे.त्या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले आहेत.त्यात एक तरुण,त्याची बहुदा पत्नी व त्यांची एक चिमुकली मुलगी असा तिघांचा समावेश आहे.

चक्काचूर झालेली दुचाकी छायाचित्रात दिसत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक आदींनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रक ताब्यात घेतला आहे.पुढील कारवाईसाठी सदर शव कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले आहे.

दरम्यान मयताच्या दुचाकी वरील पिशवीत कोरे कपडे दिसून आले आहे.दुचाकीवर पाठीमागील बाजूस,’अश्विन’ असे नाव लिहिलेले आहे.संबंधितांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी केले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे.दरम्यान या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.