गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा उच्छाद,आठवड्यात तीन गुन्हे दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे,सुरेगाव व कासली शिवारात सात दिवसात तीन चोऱ्या उघड झाल्या असून त्यात काल रात्रीच्या सुमारास अज्ञातच चोरट्याने तेथील कांदा व्यापाऱ्याच्या वजन काटा कार्यालयाचा कडी-कोयंडा तोडून व आत प्रवेश करून तेथील टेबलच्या ड्रॉवर मधील रोख रक्कम ४० हजार रुपये लंपास केले असल्याची फिर्याद ज्ञानेश्वर भिकाजी निकम (वय-४५) यांनी दाखल केली आहे.तर दुसरा गुन्हा श्रीधर दत्तू कदम यांनी तर तिसरा गुन्हा शरद रामदास पोटे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
धोत्रेस शिवारात दि.२ सप्टेंबर रोजी २५ हजारांची ट्रॅक्टर ट्रेलर तर ७ सप्टेंबर ला रात्री सुरेगाव शिवारात दुकान उचकटून १४ हजारांची ऑइल चोरी तर कासली शिवारात दि.९ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० नंतर तर दुसऱ्या दिवशीच्या पहाटे २.१५ वाजेच्या आत कोणातरी अज्ञातच चोरट्याने व्यापाऱ्यांच्या कार्यालयावर पाळत ठेवून त्या ठिकाणी कोणी नाही हि संधी साधत तेथील कार्यालयाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला असल्याचे दिसून येत आहे.व त्या ठिकाणी असलेल्या टेबलच्या ड्रॉवर मधील रोख रक्कम ४० हजार रुपयांवर आपला हात साफ केला आहे.
वर्तमानात कोपरगाव तालुक्यातच चोरट्यानी पून्हा एकदा डोके वर काढले आहे.आपेगाव शिवारात मे महिन्यात तेथील वृद्ध पती-पत्नी यांचा खून करून दोघांना ठार केल्यानंतर या भागात तशी मोठी चोरी झाली नव्हती मात्र या परिसरात मोठी दहशत पसरली होती.आता मात्र पुन्हा एकदा चोरट्यानी डोके वर काढले असून तालुका पोलिसांना नाक खाजवून आव्हान दिले आहे.वर्तमानात पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचा या हद्दीतच गुन्हेगारांवर चांगला वाचक असला तरी वरचेवर या घटनात वाढ होत असून याने कोपरगाव तालुका पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.अशीच घटना आधी २ सप्टेंबर रोजी धोत्रे याठिकाणी तर त्या नंतर दि.७ सप्टेंबर रोजी रात्री सुरेगाव येथे घडली आहे.त्या नंतर शिरसगाव उपबाजार नजीक असलेल्या कासली शिवारात घडली आहे.
दरम्यान पहिला गुन्हा दि.२ सप्टेंबर रोजी घडला असून त्या रात्रीच्या सुमारास अज्ञातच चोरट्याने धोत्रे शिवारात फिर्यादी शरद रामदास पोटे यांच्या वस्तीवरून सुमारे २५ हजार रुपये किमतीची लाल रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली (क्रं.एच.एच.२० ए.एस.२२८९) हि पाळत ठेऊन पळवून नेली आहे.त्यांनीही कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.क्रं.३४८/२०२२ भा.द.वि.३७९ प्रमाणे अज्ञातच चोरट्या विरुद्ध दाखल केला असतांना पुढील सप्ताहात आणखी दोन गुन्हे घडले आहे.
दुसऱ्या गुन्ह्यात सुरेगाव येथील फिर्यादी श्रीधर कदम यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यात त्यांच्या अटोमोबाईल दुकानात दि.७ सप्टेंबर रोजी घडली असून त्यात त्यांच्या दुकानातील माल १४ हजांराचा माल चोरट्यांनी लंपास केला आहे.त्यात विडॉल कंपनीचे ऑइल डबे व पाऊच,एच.पी.कंपनीचे डबे,कॅष्ट्रोल कंपनीचे ऑइल डबे आदीचा समावेश आहे.
तर दुसरी घटना शिरसगाव येथील असून येथे दोन वर्षांपूर्वी कांदा बाजार सुरु झाला असून या ठिकाणी त्यास शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून या परिसरात व्यापारी व शेतकरी यांच्यात मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.या आर्थिक उलढालीवर चोरट्यांची वक्रदृष्टी गेली नाही तर नवल ! त्याच ठिकाणी कासली शिवारात तेथील व्यापारी ज्ञानेश्वर निकम यांची पेढी आहे.त्या ठिकाणी त्यांनी व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी वजन काटा उभारला आहे.व त्यासाठी छोटेखानी कार्यालय आहे.
दि.९ सप्टेंबर रोजी रात्री ७.३० नंतर तर दुसऱ्या दिवशीच्या पहाटे २.१५ वाजेच्या आत कोणातरी अज्ञातच चोरट्याने त्यांच्या कार्यालयावर पाळत ठेवून त्या ठिकाणी कोणी नाही हि संधी साधत तेथील कार्यालयाच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला असल्याचे दिसून येत आहे.व त्या ठिकाणी असलेल्या टेबलच्या ड्रॉवर मधील रोख रक्कम ४० हजार (त्यात १०० रुपये दराच्या नोटा,५० रुपये दराच्या १७० नोटा,व १० रुपये दाराच्या काही नोटा) रुपयांवर आपला हात साफ केला आहे.दरम्यान या घटनेने कासली,शिरर्सगाव शिवारात व्यापारी व शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान हि घटना त्यांना पहाटे २.१५ वाजेच्या सुमारास निदर्शनास आली होती.त्यांनी तत्काळ कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञातच चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.अनुक्रमे ३४९ व ३५०/२०२२ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली अनुक्रमे तीन गुन्ह्याचा तपास पो.हे.कॉ.आर.एम.म्हस्के,पोलीस नाईक आर.टी.चव्हाण व पोलीस उपनिरीक्षक धाकराव हे करीत आहेत.