जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…’त्या’अधिकाऱ्यांचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे रवाना !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील तहसीलदार विजय बोरूडे यांच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता पोलीस तपास सुरु असताना त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाने त्यांच्या बाबतचा अहवाल तयार करून आयुक्त कार्यालयात पाठवला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे आता त्यांच्यावर नाशिक येथील महसूल आयुक्त काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

वर्तमानात कोपरगाव महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्ट येथे लायन्स क्लब कोपरगाव यांचा ‘एक्स्पो’चा उदघाटन समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून यात.या महाशयांनी हजेरी लावली असून त्या ठिकाणी ईशान्य गडावरील युवक नेत्याने यांचेशी संपर्क साधला असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.त्याबाबत आमच्या प्रतिनिधींच्या हाती सदर छायाचित्र हाती आले आहे.विशेष म्हणजे एवढे महाभारत होऊनही सदर इसम राजरोस सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दि.२५ फेब्रुवारी रोजी पहाटे ०५.१५ वाजेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करून तेथील दरवाजा ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व तेथील महिला रुग्णाच्या नातेवाईक तरुणीशी असभ्य वर्तन केल्या प्रकरणी दि.२५ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोग्य विभागाच्या महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.कोपरगाव शहरासह तालुक्यातील राजकीय व सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली होती.त्यामुळे या प्रकरणाने तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरण ढवळून निघाले होते.त्याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.दरम्यान पोलीस ठाण्यात सदर महाशयांनी पोलीस अधिकाऱ्यांसह कोपरगाव तालुक्यातील ईशान्य व पश्चिम गडावरील दोन राजकिय नेत्यानांही आपल्या कर्तबगारीचा (?) नमुना दाखवला होता.त्याबाबत पोलिसांकडे पूरावे असल्याचे समजले जात आहे.त्यामुळे त्यांना राजकीय पाठबळ पुरविणारे आपोआप पाठीमागे सरकले असल्याचे आढळून आले होते.दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी या महाशयांचे अन्य ठिकाणचे संशयित सि.सी.टी.व्ही.फुटेज तपासले असता त्यात साईबाबा कॉर्नर वरील एका हॉटेल मध्ये सदर महाशय साधारण दि.२४ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते दि.२५ पहाटे ०४.३० च्या दरम्यान,’रात्रीचा खेळ करताना’ आढळून आले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याला शहर पोलिसांनी दुजोरा दिला आहे.त्यामुळे आता या बाबत पोलिसांना सबळ पुरावे उपलब्ध होणार आहे.त्यामुळे सदर महिलेच्या विनयभंगाच्या गुन्हयात आरोप सिद्धीसाठी ते उपयुक्त ठरणार असल्याचा कयास व्यक्त होत आहे.दरम्यान वर्तमानात कोपरगाव महात्मा गांधी प्रदर्शन ट्रस्ट येथे लायन्स क्लब कोपरगाव यांचा ‘एक्स्पो’चा उदघाटन समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून यात.या महाशयांनी हजेरी लावली असून त्या ठिकाणी ईशान्य गडावरील युवक नेत्याने यांचेशी संपर्क साधला असल्याचे विश्वसनीय वृत्त हाती आले आहे.त्याबाबत आमच्या प्रतिनिधींच्या हाती सदर छायाचित्र हाती आले आहे.विशेष म्हणजे एवढे महाभारत होऊनही सदर इसम राजरोस सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होत असल्याचे दिसून येत आहे.व वरिष्ठ राजकीय नेते आणि अधिकारी हे ‘मूक भीष्माचार्य’ बनले आहे.त्यात कहर म्हणजे विविध संघटना त्यांना निमंत्रण देत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे हे विशेष !दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने याबाबत वरीष्ठ कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून नाशिक येथील महसूल आयुक्तांकडे पाठवला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.आता सदर अधिकारी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close