जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

कोपरगाव काँग्रेसचे कार्यालय चोरीस…समन्वय समितीत चर्चा ?

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव येथे अ.नगर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका काँग्रेस कमिटीची समन्वय आढावा बैठक नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली असून स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार त्यासाठी काँग्रेसचे विचार शेवटपर्यंत पोहोचवण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले असल्याची माहिती राज्य सचिव नितीन शिंदे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.दरम्यान या बैठकीत काँगेसचे कार्यालय चोरीस गेले असल्याची जोरदार चर्चा झाली आहे.

दरम्यान कोपरगाव शहरातील काँग्रेसचे सन-१९५९ साली तत्कालीन विश्वस्त माजी आ.स्व.दादा पा.रोहमारे,बाबूलाल शहा,श्री लोहाडे आदींनी अवघे २८ हजरात खरेदी केलेलं काँग्रेसचे कार्यालय राष्ट्रवादीच्या एका वर्तमान सत्ताधाऱ्याने बळकावले असून त्यात आता आपल्या घरातील बाप,आई,मुलगा आदी तीन विश्वस्त नेमले असून त्यात आता प्रदर्शन ट्रस्टचे कार्यालय थाटले असल्याची त्यावेळी जोरदार चर्चा झाली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्या विरोधात आता पुणे येथे धर्मादाय आयुक्त यांचे समोर सुनावणी सुरु आहे.त्याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

नगर शहर आणि ग्रामीण भागात अस्तित्वहीन होण्याच्या मार्गावर असलेल्या काँग्रेसला नव्याने उभारी देण्यासाठी जिल्हा पदाधिकाऱ्यांनी धडपड सुरू केली आहे.ग्रामीण भागात राष्ट्रवादी आपली ताकद वाढवित असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अनेक वर्षांपासून निरव शांतता अनुभवण्यास येत होती.महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये असतानाही जे प्रयत्न प्रभावीपणे झाले नाहीत ते आता विरोधी पक्षात असताना आणि मुख्यत्वे कर्नाटकच्या निकालानंतर काँग्रेसने सुरू केल्याचे दिसत आहे.त्यामुळे त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक,नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती आदी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला दौरा सुरु केला आहे.त्यात कोपरगावात जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच कोपरगाव शहरात संपन्न झाली आहे.

त्यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वय ज्ञानदेव वाफारे आणि अनुसूचित जाती जमातीचे अध्यक्ष राजेंद्र वाघमारे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष स्मितल वाबळे,प्रदेश काँग्रेस सरचिटणीस नितीन शिंदे,मंगल भुजबळ ओबीसी सेलच्या राष्ट्रीय सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान या बैठकी नंतर सदर जिल्हा काँग्रेस समिती काय निर्णय घेणार याकडे काँग्रेसप्रेमी नागरिकांचे लक्ष लागून आहे.

काँग्रेस पक्ष हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारा पक्ष आहे.निवडणुकांसाठी आत्ताच कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.तालुका व जिल्हा कार्यकारिणीसाठी नव्याने नावे सुचवावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर प्रसंगी जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय जाधव,कोपरगाव शहराध्यक्ष तुषार पोटे,जिल्हा सरचिटणीस सुनील साळुंखे,श्री कडू,चंद्रकांत बागुल,यादव त्रिभुवन,राजू पठाण,राहुल गवळी,कैलास पंडोरे,महादेव जगताप,बाबुराव पवार,सोपान धेनक,ज्ञानेश्वर भगत,अब्बास भाई,चंद्रहार जगताप,रौनक अजमेरे,सचिन होन,बबलू जावळे,शितल देशमुख,लक्ष्मण फुलकर,श्रीजय चांदगुडे आदिसंह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close