विविध पक्ष आणि संघटना
शिवसेनेचा खरा गद्दार कोण ठाकरे की शिंदे?
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपण मूळ शिवसेनेकडे कोणत्या दृष्टीने बघतो त्यावर ते अवलंबून आहे.शिवसेना संस्थापक हिंदूहृदयसम्राट (?) बाळ ठाकरे यांचे तत्वज्ञान बघता त्यातील महत्वाचे असे फक्त पाच मुद्दे जरी पहिले तरीही या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.
युतीत निवडणुका लढवल्यावर ज्या पक्षाच्या जागा जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री.
कायम कॉंग्रेसला कडाडून विरोध.कॉंग्रेसमधील गांधी घराणेशाहीला कडाडून विरोध.
कायम कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार आणि कट्टर हिंदू नेते आदरस्थानी.सत्तेसाठी मूळ तत्वाची लाचारी नाही.
आता २०१९ च्या निवडणुका शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढवल्या ज्यात भाजपला जास्त जागा मिळाल्या तर शिवसेनेला कमी या न्यायाने भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा होता पण ऐनवेळी शिवसेनेने भाजपचा हात सोडून ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांचा हात हाती घेऊन सरकार स्थापन केले. हा निर्णय शिंदे यांचा असेल का उद्धव ठाकरे यांचा ? बाळ ठाकरे यांनी कायम कॉंग्रेसला कडाडून विरोध आणि विरोधच केला होता आणि त्यातही खास करून कॉंग्रेसमधील गांधी घराणेशाहीचा विरोध केला होता … त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या भाषणातही त्यांनी त्याचा उल्लेख केला होता …
जसे माझ्यावर प्रेम केलेत तसेच उद्धव वर करा आणि नंतर आदित्य वर करा … वगैरे. मग असे असताना युतीत २५ वर्ष कुजली म्हणत त्याच कॉंग्रेस बरोबर समझोता करून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय शिंदे यांचा असेल का उद्धव ठाकरे यांचा? बाळ ठाकरे यांनी कायम कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार केला आणि इतिहासात हिंदुत्ववादी भूमिका घेणाऱ्या नेत्यांचा आदर केला.
कॉंग्रेसच्या मुखपत्रात जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी अत्यंत घृणास्पद मजकूर छापून आला होता तेव्हा शिवसेनेने काय पवित्रा घेतला होता … आता हा पवित्रा घेण्याचा निर्णय शिंदे यांचा असेल का उद्धव ठाकरे यांचा?सत्तेसाठी बाळ ठाकरे लाचार झाले नाहीत … तेव्हा कॉंग्रेस + राष्ट्रवादी बरोबर समझोता करण्याचा निर्णय शिंदे यांचा असेल का उद्धव ठाकरे यांचा? जर वरील निर्णय उद्धव ठाकरे यांचे असतील तर मग ते नक्कीच बाळ ठाकरे यांचे शिवसैनिक नाहीत असेच म्हणावे लागेल. एखाद्या घटनेचे श्रेय जर नेत्याला दिले जात असेल तर चुकीच्या निर्णयासाठीही त्यालाच जबाबदार धरावे लागेल.