जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यातील चोरीतील ऐवज जप्त,चोरटा मात्र फरार

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्याच्या पश्चिमेस साधारण ३० कि.मी.अंतरावर असलेल्या चासनळी शिवारात नुकताच अज्ञातच चोरट्याने फिर्यादी बापू नाना तनपुरे यांच्या घरासमोर उभा करून ठेवलेला ३.५० लाखांचा ट्रॅक्टर व एक २.१५ लाख रुपयांचे थ्रेशर मशीन असा एकूण ५.६५ लाखांचा ऐवज लंपास केला होता त्यातील आरोपी फरार असला तरी कोपरगाव तालुका पोलीसांनी ट्रॅक्टर व त्यावरील पुन्नि मशीन आदी मुद्देमाल चांदेकसारे येथून जप्त केला आहे.त्याबाबत पोलिसांचे कौतुक होत आहे.


हाच तो चासनळी येथील चोरीतील ऐवज,पोलिसांनी तो जप्त केला आहे.



    कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण सहा कि.मी.अंतरावर असलेल्या संवत्सर शिवारात नऊ चारी नजीक रहिवासी असलेले शेतकरी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या वस्तीवर दि.१५ सप्टेंबर च्या पहाटे १.३० च्या सुमारास ६-७ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने चाकुसारख्या हत्याराचा धाक दाखवून सोने-नाणे अशा चिज वस्तू मिळून अंदाजे १२ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणाच्या बातम्यांची शाई वाळलेली नसताना पाच दिवसापूर्वी मध्यरात्री पुन्हा एकदा चोरट्यानी आपली ‘लीला’ तालुका पोलिसांना दाखवून दिली होती.त्यामुळे वाहन चालकांत खळबळ उडाली होती.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close