जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
विविध पक्ष आणि संघटना

बी.डी.महाग झाली पण ई.डी.ची नोटीस स्वस्त झाली-टीका

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भाजपने देशात राजकारणाची कोणती अवस्था करून टाकली आहे.बी.डी.महाग झाली पण ई.डी.ची नोटीस स्वस्त झाली असून देशात द्वेषाचे राजकारण सुरू झाले असल्याचे प्रतिपादन युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष मेहमूब शेख यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

खा.शरद पवार यांच्या सारखा विकास कामाबाबत सर्व पक्षांनी विचार करायला हवा.असे सांगून आपल्या स्वभावाबाबत शेख यांनी केलेल्या टिपणीबाबत बोलताना,”आपला स्वभाव असाच शांत आहे मात्र वेळ काळ आल्यावर आपण बरोबर कार्यक्रम करतो” असे सांगितले आहे.निवडणुकीत आमचे नेते शरद पवार यांनी जनतेला आश्वस्त केल्याने आपण निवडून आलो असल्याचा दावाही साईबाबा संस्थांचे अध्यक्ष-आ.आशुतोष काळे यांनी केला आहे.

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस आयोजित शरद युवा संवाद यात्रा प्रदेशाध्यक्ष मेहमूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोपरगाव येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आली होती त्या वेळी ते बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी साई संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे हे होते.

सदर प्रसंगी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,जिल्हा राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,युवा राष्ट्रवादीचे तालुलाध्यक्ष चारुदत्त सिनगर,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,माजी नगरसेवक रमेश गवळी,कृष्णा आढाव,राष्ट्रवादीच्या महिला शहाराध्यक्षा प्रतिभा शिलेदार,युवकचे कार्याध्यक्ष संजय कोळगे,कपिल पवार,कृष्णा गाव आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”भाजप सत्तर वर्षात,देशात काहीच विकास झाला नव्हता म्हणतात, रस्ते,गाड्या,शिक्षण संस्था काहीच नव्हते असे सांगत सुटले आहे.आता केवळ २०१४ च्या आधी लोक झाडपाला लावून गावभर हिंडत होते असेच सांगायचे राहिले आहे अशी कोपरखिळी भाजपला मारली आहे.शरद पवार जातीयवादी असते तर मराठवाडा विद्यापीठास डॉ.आंबेडकरांचे नाव दिले असते का ? असा सवाल उपस्थितांना विचारला आहे.तारिक अन्वर,हसन मुश्रीफ,फौजिया खान यांना मोठ्या पदावर विराजमान केले असते का असा सवाल केला आहे.माजी मंत्री मधुकर पिचड कोठे पोहचले.ओ.बी.सी.आरक्षण आघाडी सरकारने घालवले म्हणता मग तुम्ही संसदेत तोच डाटा कसा योग्य आहे हे तुम्ही कसे सांगितले आहे.व्ही.पी.सिंगाच्या काळात ओ.बी.सी.आरक्षणास विरोध कोणी केला हे कसे विसरले आहेत.स्व.गोपीनाथ मुंडे,एकनाथ खडसे यांनी भाजप वाढवले पण यांची आज काय अवस्था केली.हेच आज दुसऱ्याच्या डोळ्यात बोटे घालायला लागली आहे.खडसे यांनी पक्ष सोडला त्यांना इ.डी.ची नोटीस आली.त्यांच्या मुलीला,पत्नीला,नोटीस दिली काय चालू आहे.फुलांचे हार पुरविणाऱ्याला ई.डी.ची नोटीस दिली जाते ही भाजपने देशात राजकारणाची कोणती अवस्था करून टाकली आहे.बी.डी.महाग झाली पण ई.डी.ची नोटीस स्वस्त झाली असल्याची त्यांनी टीका केली आहे.देशात द्वेषाचे राजकारण सुरू झाले आहे.

युवकचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर यांनी बोलताना भाजपचे सामाजिक संकेत स्थळ हाताळणाऱ्या टोळधाडीवर टीका केली आहे.त्यावेळी त्यांनी आपण गुडघा बैठकीत जोरात काम करतो पण सभेत आपले पाय थरथरतात अशी कबुली दिली व ग्रामीण ठसकेबाज उदाहरणे देऊन उपस्थितांची हसवणूक केली.

त्यावेळी आपल्या नेत्यांवर टीका करणाऱ्या व्यक्तीला प्रसाद देण्यासाठी विसरू नका तसे युवक पक्षात आले तरच आपल्याला उज्वल भवितव्य राहील असे आश्वासन दिले आहे.शेवटी त्यांनी कार्यकर्त्याना भाजप सरकारने काय दिले हे वदवून घेतले व राष्ट्रवादीच्या घोषणा दिल्या.

सदर प्रसंगी त्यांनी आ.काळे यांचे कौतुक करताना ते म्हणाले की,”पक्ष वाईट अवस्थेत असताना कोपरगाव करांनी त्यांना साथ दिली ही मोलाची बाब आहे.त्याच बरोबर नगर जिल्हा राष्ट्रवादीच्या शरद पवार यांचे बरोबर राहिला ही फार समाधानाची बाब आहे.आ.काळे हे हसतमुख व्यक्तीमत्व आहे.त्यांचेकडे पाहिल्याबरोबर दुःख हरण होत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.त्याच बरोबर पुण्यातील हिंजवडी येथे आय.टी.क्षेत्र कसे आले व त्यासाठी तरुण पिढीसाठी काय केले याचे एका जोडप्याचे मिश्किल उदाहरण देऊन सांगितले आहे.

सदर प्रसंगी आ.काळे बोलताना म्हणाले की,”मेहबूब शेख यांच्या कामाचे कौतुक केले व देशात दूरदर्शन सुरू केल्यावर समाजात तेढ निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे.व हिंदू मुस्लिमांमध्ये दुही निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचे दिसते.व भडकावू बातम्यापासून विभक्त राहण्याचे आवाहन केले आहे.शरद पवार यांच्या सारखे विकास कामाबाबत सर्व पक्षांनी विचार करायला हवा.असे सांगून आपला स्वभाव असाच आहे मात्र वेळ काळ आल्यावर आपण बरोबर कार्यक्रम करतो असे सांगितले आहे.निवडणुकीत आमचे नेते शरद पवार यांनी जनतेला आश्वस्त केल्याने आपण निवडून आलो असल्याचा दावा केला आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन संदीप वर्पे यांनी त्यावेळी राष्ट्रवादीच्या खा.सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी घरी जाऊन स्वयंपाक करण्याची टीका केल्याबद्दल प्रखर टीका केली आहे.व सर्वच महिला ते काम करत असतात त्यात विशेष काही नाही.तयावेळी त्यांनी आ.काळे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

सूत्रसंचलन अशोक आव्हाटे यांनी केले तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी मानले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close