जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

‘ती’आत्महत्या नव्हे,आत्महत्येस भाग पाडल्याचा गुन्हा,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील बैलबाजार रस्त्यालागत राहवासी असलेला तरुण ईश्वर भाऊसाहेब कुऱ्हाडे (वय २६) याने अज्ञात कारणाने आपल्या घरात पत्र्याचे लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली असल्याची नोंद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात झाली होती.मात्र ‘न्यूजसेवा’पोर्टलने व्यक्त केलेला अंदाज खरा ठरला असून आहे.अवैध सावकारीचा हा बळी असल्याचे निष्पन्न झाले असून या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मयतांची बहीण पूनम नारायण दाणे (वय-२६) रा.कासली ह.मु.पाथर्डी फाटा नाशिक यांनी दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मयताच्या खिशात चिट्ठी आढळून आली असून त्यास तो म्हणतो,”गणेश शेट्टी मुळे आपल्याला तणाव आला होता,”या माणसांमुळे आपल्याला जीव द्यावा लागत आहे,”तो,पैसे घेऊन पळून गेला व लोक मला ताण देत आहे.शेट्टी व बाकी लोक फोनवर धमकी देत असून मला जगणे मुश्किल झाले आहे.दोन लाखांचे चार लाख आपण देऊ शकत नाही.मला मरायचे नाही पण अन्य पर्याय दिसत नाही” कोपरगाव शहर पोलिसांनी सदर चिट्ठी जप्त केली आहे.

कोपरगाव शहरातील बैलबाजार रस्त्यालागत रहीवासी असलेला तरुण ईश्वर भाऊसाहेब कुऱ्हाडे (वय २६) याने दि.०९ मे रोजी सकाळी ०८ वाजेपुर्वी अज्ञात कारणाने आपल्या घरात पत्र्याचे लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली असल्याची खबर शेजारी रहात असलेले वकील नितीन गंगावणे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली होती.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.३३/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंदणी केली होती.व पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे हे करीत होते.

दरम्यान या प्रकरणी परिसरातील नागरिक अवैध सावकारीबाबत चर्चा करताना आढळून येत होते.यापूर्वीही अवैध सावकारीतून अनेक बळी गेले असल्याच्या घटना घडल्या आहेत.मात्र अनेकांना राजकीय अभय असल्याने त्या उघड झाल्या नव्हत्या.

दरम्यान या घटने बाबत पोलीस अधिकारी वासुदेव देसले यांनी खोलात जाऊन घटनेचा तपास केला असता त्यात तथ्य आढळून आले आहे.या प्रकरणी फिर्यादी महिला व मयताची बहीण हिने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण नाशिक येथील रहिवासी असून आपले माहेर कोपरगाव येथील बैल बाजार रोड येथील आहे.आपण काही दिवसापूर्वी आपला मयत भाऊ ईश्वर कुऱ्हाडे यास फेब्रुवारी महिन्या पूर्वी आलो असता तो आपल्याला तणावाखाली आढळला होता.त्यास याबाबत विचारले असता त्याने आपल्याला सांगितलेच होते की,”माझ्या ओळखीचा गणेश शेट्टी याने आपल्याकडून १५ लाख रुपये घेतले आहे.तो आपले रक्कम देण्यास टाळाटाळ करत आहे.त्यावेळी आपण त्याची समजूत काढून परत नाशिक येथे आपल्या घरी गेले होते.

त्या नंतर १९ मार्च २०२२ रोजी गणेश शेट्टी याने त्यास कर्नाटक बँकेचा मुंबई दादर (प.) ४०००२८ या शाखेचा खाते क्रं.५२७२०००१०००२४४०१ चा १५ लाखांचा धनादेश क्रं.९०९६६५ हा दिला होता.मात्र तो वटला नाही.परंतु सदर धनादेश वटला नाही.दरम्यान शेट्टी हा रक्कम न देता आपल्या मयत भावास मानसिक त्रास देत होता.या शिवाय शेट्टी हा सदर रक्कम न देताच पळून गेला होता.त्यामुळे मयत भाऊ याने पर्यायी व्यवस्था म्हणून किरण दादू यांचे कडून दोन लाखांची रक्कम उसनवार घेतली होती.मात्र शेट्टी हा पैसे देत नसल्याने किरण दादू याचे पैसे देणे जमत नव्हते त्यामुळे आपला मयत भाऊ मानसिक दबावात होता.त्याची माहिती त्याने आपल्याला दिली होती.उलट शेट्टी हा पळून जाऊन आपले पैसे न देता आपल्या भावाला मारण्याची धमकी देत होता.याशिवाय किरण दादू याचे काही लोक आपल्याला पैशाचा तगादा लावत होते.व गल्लीत येऊन मारण्याची धमकी देत होते.या लोकांनी आपल्या भावाला जगणे मुश्किल करून टाकले होते.

घटनेच्या आदल्या रात्री किरण दादू लासे याचा आपल्या पतीच्या भ्रमण ध्वनिवर फोन आला व त्याने आपल्याला फोन करून सांगीतले होते की,”आपण ईश्वर याचे कडे पैसे मागितले असता त्याने आपल्याला मी आपल्या जीवांचे काही बरे वाईट करेल” असे म्हणून आपल्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.आपण तातडीने घटनास्थळी आलो असता त्यास दुजोरा मिळाला होता.त्याने आत्महत्या केली होती.घटनेनंतर त्याच्या खिशात दोन कागद मिळाले असून एक कोरा तर एकावर लिहिलेले होते.त्यात,”गणेश शेट्टी मुळे आपल्याला तणाव आला होता,”या माणसांमुळे आपल्याला जीव द्यावा लागत आहे”तो पैसे घेऊन पळून गेला व लोक मला ताण देत आहे.शेट्टी व बाकी लोक फोनवर धमकी देत असून मला जगणे मुश्किल झाले आहे.दोन लाखांचे चार लाख आपण देऊ शकत नाही.मला मरायचे नाही पण अन्य पर्याय दिसत नाही” असा मजकूर लिहिलेली चिट्ठी आढळून आली आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी हि चिट्ठी जप्त केली आहे.

दरम्यान या प्रकरणी फिर्यादी महिला पूनम दाणे हिने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे करित आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close