विविध पक्ष आणि संघटना
विभागीय शिक्षक परिषदेच्या सहकार्यवाह पदी राजेंद्र थोरात
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाची उत्तर महाराष्ट्र (नाशिक) विभागीय कार्यकर्ता बैठक नुकतीच राहाता येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या वेळी संघटनेचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी नाशिक विभागीय कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली असून त्यात जवळके येथील मूळ निवासी व राहाता तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक तथा जिल्हा सहकारी शिक्षक बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र माधव थोरात यांची सह कार्यवाह या पदावर नियुक्ती केल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.
यावेळी नाशिक विभागीय कार्यकारिणी घोषित करण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष-राजेंद्र जायभाये (पाथर्डी-अहमदनगर),उपाध्यक्ष-कविराज पाटील (मुक्ताईनगर-जळगाव),उपाध्यक्ष राकेश आव्हाड (नंदुरबार),उपाध्यक्ष शंकर गाडेकर (राहुरी-अहमदनगर) उपाध्यक्ष खंडेराव उदे (नेवासा-अहमदनगर),कार्यवाह- रामकृष्ण बागल (नंदुरबार),कार्याध्यक्ष-भूषण गंगाधर चौधरी (रावेर-जळगाव),कार्याध्यक्ष-मिलिंद तनपुरे ( कर्जत-अहमदनगर),सहकार्यवाह-बाबासाहेब पवार (नगर-अहमदनगर),सहकार्यवाह-मनोज साहेबराव चव्हाण (जळगांव) आदींच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
राजेंद्र थोरात हे शिक्षक जिल्हा सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष असून शिक्षकांसाठी विविध चळवळीत ते कार्यरत आहे.यावेळी नूतन कार्यकारिणीचे प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू,राज्याध्यक्ष राजेश सुर्वे,आदर्श शैक्षणिक समूह पनवेलचे अध्यक्ष धनराज विसपुते,राहाता पंचायत समितीचे सभापती जपे,राज्य कार्याध्यक्ष मधुकर उन्हाळे,बाबुराव पवार,राज्य संघटनमंत्री सुरेश दंडवते,राज्य संपर्कप्रमुख रावसाहेब रोहकले गुरुजी राज्य संपर्क प्रमुख,दिलीप पाटील,राज्य सहकार्यवाह पुरुषोत्तम काळे,राज्य उपाध्यक्ष संजय शेळके,राहाता गट शिक्षणाधिकारी काळे,राज्य प्रसिद्धीप्रमुख रविकिरण पालवे आदिनीं अभिनंदन केले आहे.