जाहिरात-9423439946
महाराष्ट्र

….,”शासनाचा निवडणूक प्रचार लय भारी”

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

अ.नगर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज गुरूवार दि.१७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथील मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला असला तरी हा कार्यक्रम म्हणजे,”शासन आपल्या दारी,अन,’शासनाचा निवडणूक प्रचार लय भारी” अशा स्वरूपाचा असल्याची प्रतिक्रिया सामान्य जनांत उमटली आहे.

दरम्यान सदरची सभा आटोपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अनुक्रमे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदी प्रमुख नेत्यांनी शिर्डी येथे साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे त्यावेळी उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी आदींनी त्यांचा सत्कार केला आहे.

अ.नगर जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम आज गुरूवार दि.१७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथील मैदानावर मोठ्या उत्साहात पार पडला असला आहे.त्यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे हे होते.

सदर प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या म्हणण्यानुसार निळवंडेचा मुद्दा छेडला असून ज्यांनी (काँग्रेसने) गत ५३ वर्षात निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आणले नाही.ते आमच्या सरकारने करून दाखवले असल्याचे सांगून ३१ मे रोजी आपण निळवंडे कालव्यांची ११० कि.मी.ची (वास्तविक हा डावा कालवा केवळ ८७ कि.मी.आहे) चाचणी घेतली असून थेट मंत्री विखे यांनाच एकार्थी समोरासमोर शालजोडा लगावला आहे.(कारण मंत्री विखे हेच तीन पिढ्या काँग्रेसमध्ये असताना त्यांचा विरोध होता) या धरणाखाली आता दुष्काळी १८२ गावे सिंचनाखाली येणार आहे.

सदर प्रसंगी राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर,खा.सदाशिव लोखंडे,खा.डॉ.सुजय विखे,आ.राम शिंदे,आ.आशुतोष काळे,आ.बबनराव पाचपुतें,आ.मोनिका राजळे,आ.किरण लहामटे,जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले,माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के,माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,आशिष येरेकर,आयुक्त राधाकृष्ण गमे,जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,माजी आ.वैभव पिचड,माजी आ.स्नेहलता कोल्हे,संजीवनी सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे,अभय आगरकर,गोदावरी दूध संघाचे तथा महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे,कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले,कोपरगाव येथील गटविकास अधिकारी संचिन सूर्यवंशी,जिल्ह्यातील गटविकास अधिकारी,तहसीलदार संदीपकुमार भोसले,जिल्ह्यातील सरपंच,ग्रामसेवक,महसूल कर्मचारी आदींसह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान नगर-नाशिक-मराठवाडा सिंचन वादावर त्यांनी भाष्य करताना आपण हा वाद सोडविण्यासाठी आगामी काळात पश्चिम घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेस वाळवून या भागातील गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण करणार असल्याचे सांगितले आहे व राज्य दुष्काळ मुक्त करणार असल्याचे शेवटास सांगितले आहे.त्यासाठी आगामी काळात संपन्न होणाऱ्या निवडणुकीत तुमची मतदानाची ताकद लागणार असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.

त्यावेळी मुंख्यमंत्री म्हणले की,”आपले सरकार सत्तेत आले तेंव्हा विरोधक म्हणत होते की,” तुमचे सरकार पडणार” त्यासाठी विविध भविष्यवाण्या वेळोवेळी झाल्या होत्या.मात्र त्यातील एकही खरी झाली नाही.विशेष म्हणजे वर्षाने राष्ट्रवादीचे अजित पवार हेच सरकार पक्के करण्यासाठी आपल्याकडे आल्याने सरकार आणखी पक्के झाले असून विरोधक तोंडघशी पडले असल्याची कोपरखिळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता मारली आहे.त्यातच जनता आणि मतदार पाठीशी असल्यावर आमचा कोणी केस वाकड करु शकत नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.जनतेने सामान्य शेतकऱ्याच्या पोराला मुख्यमंत्री बनवले आहे हि तुमची ताकद आहे.आपण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान सैनिक असल्याचे सांगून,” आपल्याला स्वराज्य रक्षक संताजी- धनाजी सारखे कितीही पाण्यात पाहिले तरी आपले कोणी वाकडे करु शकणार नाही” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.’कावळ्यांच्या शापाने गाय मरत नाही’ असा टोला त्यांनी माजी मुखमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे.त्यावेळी त्यांनी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम सर्वात मोठे सुरु असून त्यांना जगभर मान्यता मिळाली असून जगातील नेते त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना सलाम करत आहेत.काँग्रेस राजवटीत सत्तर वर्षात जितके कामे झाली नाही इतकी कामे त्यांनी नऊ वर्षात करून विक्रम स्थापित केला असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.त्यांच्या आईचे निधन झाले त्यावेळी त्यांनी आपले अश्रू पुसून लगेच कर्तव्याला सुरुवात केली होती याची आठवण त्यांनी करून दिली आहे.त्यांच्या पाठीशी जनता असल्याने त्यांच्या बाबत विरोधक जे वाईट चिंतीत होते त्यातील काहीही नऊ वर्षात झाले नाही.त्यांनी देशात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत.तरीही विरोधकांनी त्यांच्यावर लोकसभेत विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे.राज्यात आपल्या हाती सत्ता आली त्यावेळी राज्याच्या पुढे गुजरात आणि कर्नाटक आदी राज्य गुंतवणुकीबाबत आघाडीवर होते.मात्र आपल्या हाती सत्ता आल्यावर राज्याचे चित्र बदलून गेले आहे.आता राज्यात सर्वाधिक जास्त गुंतवणूक आली असल्याचे कौतुक त्यांनी केले आहे.दरम्यान राज्यात पावसाने ओढ दिली आहे हे मान्य करून त्यांनी आगामी काळात पाऊस नक्की पडेल अशी आशा व्यक्त करून शिर्डीचे साईबाबा नक्कीच शेतकऱ्यांना निराश करणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.व जर दुर्दैवाने कदाचित पाऊस झालाच नाही तर सरकारने सर्व शेतकऱ्यांचा एक रुपयांत विमा काढलेला असून त्यांना त्याची भरपाई मिळेल त्यासाठी सरकार शेतरक्यांच्या पाठीशी उभे राहील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.राज्यात आपण,’महात्मा फुले जनारोग्य योजना’ आणून नागरिकांना पाच लाखांची वैद्यकीय मदत दिली असून त्यांच्या जीवनात कुठल्याही दवाखान्यात आता रोकड विरहित मोफत उपचार होणार असल्याने त्यांचे आरोग्य सुकर झाले आहे.सदर प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या म्हणण्यानुसार निळवंडेचा मुद्दा छेडला असून ज्यांनी (काँग्रेसने) गत ५३ वर्षात निळवंडेचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात आणले नाही.ते आमच्या सरकारने करून दाखवले असल्याचे सांगून ३१ मे रोजी आपण निळवंडे कालव्यांची ११० कि.मी.ची (वास्तविक हा डावा कालवा केवळ ८७ कि.मी.आहे) चाचणी घेतली असून थेट मंत्री विखे यांनाच एकार्थी समोरासमोर शालजोडा लगावला आहे.(कारण मंत्री विखे हेच तीन पिढ्या काँग्रेसमध्ये असताना त्यांचा विरोध होता) या धरणाखाली आता दुष्काळी १८२ गावे सिंचनाखाली येणार आहे.आपण सत्तेत आल्यावर अनेक प्रकल्पाना सुप्रमा व मंजुऱ्या दिल्या आहेत.त्यामुळे राज्यात ०८ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला आहे.दरम्यान नगर-नाशिक-मराठवाडा सिंचन वादावर त्यांनी भाष्य करताना आपण हा वाद सोडविण्यासाठी आगामी काळात पश्चिम घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेस वाळवून या भागातील गोदावरी खोऱ्यात अतिरिक्त पाणी निर्माण करणार असल्याचे सांगितले आहे व राज्य दुष्काळ मुक्त करणार असल्याचे शेवटास सांगितले आहे.त्यासाठी आगामी काळात संपन्न होणाऱ्या निवडणुकीत तुमची मतदानाची ताकद लागणार असल्याचे सांगण्यास ते विसरले नाही.प्रारंभी त्यांनी आपण मागील दौऱ्यात नगर जिल्ह्याचे नामांतर,’अहिल्यानगर’ केल्याची आठवण करुन दिली आहे.नगर जिल्ह्यात आपण समृद्धीच्या माध्यमातून नवनगरे स्थापन करून तेथील ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे शेवटी सांगीतले आहे.सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी,”आपण पुन्हा येणार,पुन्हा येणार” यावर काही व विरोधकांनी टीका केली व तुम्ही असे कसे आले असा सवाल विचारला आहे.व जेथे जाऊ तेथे मुख्यमंत्री केंव्हा बदलणार म्हणून,”त्या, पदावर तुमचे लक्ष” असल्याचे सांगितले जाते अशी मिश्किल टिपणी केली असून त्यावर आमचे दोघा उपमुख्यमंत्र्यांचे खरेच ‘मुख्यमंत्री’ यांच्या खुर्चीवर लक्ष आहे; मात्र ते पक्की करण्यासाठी आहे असा विरोधकांचा भ्रमनिरास करणारे उत्तर त्यांनी दिले आहे.
दरम्यान त्यांनी राज्य सरकारने गत काळात एकनाथ शिंदे सरकारने शासन आपल्या दारी या योजनेद्वारे २४ लाख लाभार्थ्यांना ०३ हजार ९०० कोटींचा निधी दिला असल्याचे सांगितले आहे.व हे सरकार ३६५ दिवस कार्यरत असून,” हे केवळ फेसबुकवर कार्यरत असणारे सरकार नाही” अशी कोपरखिळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावली आहे.आपल्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना केवळ एक रुपयांत १२ लाख शेतरक्यांचा विमा उतरवला असल्याचे सांगितले आहे.प्रधानमंत्री योजनेतून ०३ लाख लोकांना आपण घरे दिली आहे.तर आता मोदी आवास योजनेतून आणखी १० लाख घरे देत आहोत.त्याखेरीज दलित,भटके आदींना वेगळे ०३ लाख घरे आहेत.घर बांधण्यासाठी ज्यांना जमिनी नाही त्यांना हे सरकार जमिनी देणार असल्याचे सांगितले आहे.मुलींच्या जन्माच्या वेळी २५ हजार रुपयांची रक्कम टाकून ती मुलगी मोठी झाल्यावर तिला ०३ लाख रुपये मिळणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.उपस्थितांचे आभार खा.डॉ.विखे यांनी मानले आहे.दरम्यान सदरची सभा आटोपल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अनुक्रमे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार आदी प्रमुख नेत्यांनी शिर्डी येथे साईबाबा समाधीचे दर्शन घेतले आहे.सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुल मंत्री राधाकृष्ण विखे,खा.सुजय विखे,सदाशिव लोखंडे आदींनी उप्पस्थितांना मार्गदर्शन केले आहे.मात्र मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या भाषणाच्या वेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर उठून जाताना दिसत होते सरते शेवटी तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाच्या वेळी तर सभामंडपातील जवळपास दोन तर तृतीयांश नागरीक निघून गेले होते.त्यामुळे समोरचा कप्पा वगळता अन्य दोन मागील कप्पे जवळपास मोकळे झालेले दिसत होते.अखेर मुख्यमंत्र्यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close