कृषी विभाग
कोपरगाव तालुक्यात रब्बी पिके भुईसपाट,पंचनामे करण्याची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या नैऋत्येस साधारण वीस कि. मी.अंतरावर असलेल्या जवळके परिसरात नुकत्याच कोसळलेल्या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान केले असून काढणीस आलेले गहू,हरभरा,मका,ज्वारी,उभी पिके भुईसपाट झाली आहे.या पिकांची नुकसान भरपाईसाठी महसूल विभागाने पंचनामे करावे अशी मागणी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.
या प्रकरणी लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत नामदेव थोरात यांनी केली आहे
कोपरगाव तालुक्यात दि.११ रोजी सायंकाळी सात वाजे नंतर आकाशात काळोख दाटून येऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला असून या अवकाळी पावसाने जवळपास दोन तास हजेरी लावून काढणीस आलेली रब्बी पिके भुईसपाट केली आहे.यात प्रामुख्याने गहू,हरभरा,ज्वारी,चारा पिके,उन्हाळी सोयाबीन आदींचा समावेश आहे.
याबाबत या पीकाचे पंचनामे करणे गरजेचे असताना या पातळीवर कोपरगाव महसूल विभागाचा शुकशुकाट आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.व या प्रकरणी लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी येथील प्रगतशील शेतकरी चंद्रकांत नामदेव थोरात यांनी केली आहे.