जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

खेडा खरेदीतून होते शेतकऱ्यांची फसवणूक-कोपरगाव बाजार समिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुक्यातील परिसरामध्ये काही खाजगी खेडा खरेदी व्यापारी बाजार समितीचा परवाना न घेता अवैधपणे शेतकरी बांधवांच्या घरी जाऊन शेतक-यांच्या शेतमालास जादा भाव देण्याचे आमिष दाखवून शेतक-यांच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेऊन आर्द्रता मशिन मध्ये हातचलाखी करून वाळलेली सोयाबीन,मका,गहु,हरबरा यांची आर्द्रता जास्त,प्रतवारी कमी असल्याचे भासवून शेतक-यांची फसवणुक होत असल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीतच आपला माल विक्रीस आणावा असेल आवाहन कोपरगाव बाजार समितीचे प्रशासक एन.जी.ठोंबळ यांनी केले आहे.

“कोपरगांव बाजार समिती आडत मुक्त असुन येथे उघड लिलावाच्या बोलीने सर्व शेतीमालाचे जाहिर लिलाव होत असल्यामुळे शेतक-यांच्या शेतीमालाला उंच भाव मिळतो.हमाली व तोलाई वगळता शेतक-याच्या पट्टीत कुठलीहि कपात केली जात नाही.या व्यतीरिक्त पैसे मिळण्याची हमी आहे.या करिता शेतकरी बांधवांनी आपला शेतीमाल खाजगी ठिकाणी न विकता कोपरगांव बाजार समितीच्या मुख्य मार्केट यार्ड कोपरगांव व उपबाजार आवार तिळवणी येथे उघड लिलावात विक्री करुन आपले आर्थिक हित साधावे”-एन.जी.ठोंबळ,प्रशासक,कोपरगाव बाजर्स समिती.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”आगामी कालखंडात सोयाबीन काढणीचा हंगाम आला असून या कालखंडात काही व्यापारी गावोगावी जाऊन शेतकऱ्याच्या शेतात.खेड्यात जाऊन ‘खेडा खरेदी’ करून शेतकऱ्यांची फसवणूक करतात असे बाजार समितीच्या लक्षात आले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.सम्बधित व्यापारी हे शेतक-यांना कमी भाव देतात तसेच शेतक-यांच्या शेतमालाचे वजनमाप करतांना इलेक्ट्रॉनिक वजन काटयात फेरफार करून वजनात क्विंटलला दोन ते पाच किलोपर्यंत काटामारी करून शेतक-यांचे आर्थिक नुकसान करतात व पैसे बुडवतात.

त्याचप्रमाणे शेतक-यांना अधिकृत हिशोबपट्टीची प्रत न देता को-या पावती बुकावर हिशोब देतात.यामुळे शेतक-यांना भविष्यात शासनाकडून मिळणा-या अनुदानाचा फायदा मिळत नाही अशा बाजार समितीचे बाहेरील व्यवहारास कायदेशिर आधार नसल्यामुळे शेतकरी बांधवांची फसवणुक होते.अशा अनेक तक्रारी शेतकरी वर्गाकडून बाजार समितीकडे वारंवार येत असतात.

वरिल फसवणुक टाळण्यासाठी असे व्यापारी परस्पर शेतमाल खरेदी करतांना आढळून आल्यास अशा व्यापा-यांची माहिती बाजार समितीला फोन नं.-०२४२३-२२२५८८ व मोबाईल नंबर ९८६०७३७८८५,९४२२१०३५९४ वर देऊन सहकार्य करावे जेणेकरून कोणत्याही शेतकरी बांधवांची फसवणुक होणार नाही.बाजार समिती कायदा १९६३ व नियम-१९६७ नुसार अशा व्यापा-यांवर कायदेशिर पोलिस कारवाई करण्यात येईल असा इशाराही शेवटी प्रशासक एन.जी.ठोंबळ व सचिव नानासाहेब रणशूर यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close