कोपरगाव तालुका
कोपरगाव पालिकेच्या जल वितरण व्यवस्थेची चाचणी का झाली नाही-माजी नगराध्यक्ष पाटील

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराला सुमारे ४२ कोटी रुपयांची पाणी योजना होऊनही त्या योजनेच्या वितरण व्यवस्थेची चाचणी अद्याप झालेली नाही तिचे अर्धवट काम असेल ते पूर्ण केल्याशिवाय कोपरगाव शहराला दिवसाआड दोन दिवसाआड पाणी देता येणार नाही त्यामुळे प्रलंबित वितरण व्यवस्थेचे काम त्वरित करा अशी महत्वपूर्ण मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना भेटून नुकतीच केली आहे.त्यामुळे शहरात उलतसुलतच चर्चेला उधाण आले आहे.
“वर्तमानात नगरपरिषद आठ दिवसाला नागरिकांना पाणी देते.यावर बंदिस्त जलवाहिणीचे पाणी आणले तरीही वितरण व्यवस्थाच सदोष असल्याने तत्कालीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी हि कोणीही सत्तेवर आले तरी दररोज पाणी देऊ शकणार नाही असे स्पष्ट बजावले होते.
कोपरगाव नगरपरिषदेने तत्कालीन सेनेचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी तत्कालीन नगराध्यक्ष यांच्या विनंतीवरून केंद्राकडून ४२ कोटी रुपयांची योजना मंजुर केली होती.त्या योजनेत वितरण व्यवस्थेसह गोदावरी डावा कालवा ते कोपरगाव शुद्धीकरण प्रकल्पापर्यंत अशुद्ध जलवाहिनी आदींचा समावेश होता.मात्र अद्याप या योजनेचे अंदाजपत्रका प्रमाणे कामे झालेली नाही हे विशेष ! यात अनेक नेत्यांनी हात मारून घेतला याबाबत आमच्या प्रतिनिधीने वेळोवेळी वाचाही फोडली होती.मात्र त्या वेळी आपले हात ओले करून घेणाऱ्या नेत्यांनीही सोयीस्कर गुपचिळीची भूमिका घेतली होती.राहिलेल्या ‘बिलाचा टक्का’ अनेक वेळा वादग्रस्त ठरला होता.त्यात श्रेयाबाबत दावा करण्याऱ्या नेत्यांचे पदाधिकारीही सामील होते हे विशेष ! या बाबत आमच्या प्रतिनिधीने कोणी किती डल्ला मारला हे सांगितले होते.व त्या प्रकरणाचा भंडाफोड केला होता.मात्र तरीही यात कोणालाही काही फरक पडला नाही उलट या प्रश्नावरून आपले लक्ष हटविण्यासाठी निळवंडेच्या बंदिस्त जलवाहिणीचे गाजर वेळोवेळी आपल्या ‘दरबारी भाटांना’ हाताशी धरून दाखविण्यात आले होते.व आजही तेच चालू आहे.दरम्यान त्यावर अनेकांनी आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत.मात्र मूळ योजना जैसे थेच आहे.याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत संजय काळे यांनी अनेकवेळा आवाज उठवला मात्र त्याला कोणीही दाद दिलीं नाही.आता या प्रश्नाला माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आगामी दोन महिन्यावर निवडणूक आल्यावर वाचा फोडली असून या प्रश्नी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे कैफियत मांडली आहे.
सदर प्रसंगी राजेश मंटाला,तुषार विध्वंस आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,” कोपरगाव शहरालगत जी जेऊर पाटोदा लगतची उपनगरे गावाला जोडली आहेत ती गावानजीक असूनही त्यांचा पाणी प्रश्न नगरपालिकेने सोडलेला नाही तो ती कधी सोडणार असा सवाल विचारला आहे.व नवीन २८ रस्त्याचे कामे चालू करण्याचा कालखंड खरा तर दिवाळीनंतर असतो मात्र पालिका हि कामे ऐन पावसाळ्यात सुरु करून कोणाचे हित साधणार आहे असा रास्त सवाल विचारला आहे.यात नागरिकांच्या निधीचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक वाटत असल्याचे सांगून,”जरी हे रस्ते करायचे ठरले असेल तर ते करण्यापूर्वी रस्त्याच्या खाली,बाजूला जर नवीन वितरण व्यवस्थेची जलवाहिनी टाकल्याची खात्री करणे गरजेचे असून रास्ता झाल्यावर त्या साठी पुन्हा रस्ता फोडण्याचा व रस्त्याचा निधी वाया जाण्याचा अनास्था प्रसंग येऊ नये असा इशारा दिला आहे.