जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…तो अपघात नसून खून,कोपरगाव पोलिसांना चौकशीचे आदेश !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील तरुण विकास गहिनीनाथ घुले याचा दि.३ जानेवारी २०२२ रोजी अपघात झाला होता मात्र त्याचा अपघात नसून ‘तो’ खून असल्याचा आरोप त्याच्या पित्याने करून याबाबत कोपरगाव येथील न्यायालयात चौकशीची मागणी केली होती.ती न्यायमूर्ती एस.एम.बन्सोड यांनी मान्य केली असून तसे आदेश कोपरगाव तालुका पोलिसांना दिले आहेत.या प्रकरणी अड्.योगेश खालकर यांनी काम पाहिले आहे.

आपल्या मुलाचा अपघात झाला नसून त्याचा खून झाला असल्याचा आरोप करून त्याच्या चौकशीची मागणी केली होती.व त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या.त्याचे सोबत त्यावेळी प्रवास करताना अन्य मायगाव देवी येथील अन्य तरुण असल्याचे सांगितले होते.व त्याबाबत कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कडे न्याय मागितला होता.त्यावर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील पत्रकार गहिनीनाथ घुले यांचे चिरंजीव विकास घुले व त्याचा त्यावेळचा सहकारी सुनील गोरख माळी रा.मायगाव देवी हे दोघे आपल्या दुचाकीवर प्रवास करत असताना त्यांचा कुंभारी शिवारात अपघात झाला होता.त्यात विकास घुले याचा मृत्यू झाला होता.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.१/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ अन्वये आपल्या दप्तरी नोंद केली होती.त्याचा चौकशी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून जबाब नोंदवले होते.व सदर घटनेचा तपास पूर्ण केला होता.

दरम्यान या बाबत मयत तरुणांचे वडील गहिनीनाथ घुले यांनी पोलीस महासंचालक मुंबई,पोलीस अधीक्षक अ.नगर,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,कोपरगाव तालुका पोलीस ठाणे आदी वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करून आपल्या मुलाचा अपघात झाला नसून त्याचा खून झाला असल्याचा आरोप करून त्याच्या चौकशीची मागणी केली होती.व त्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या.त्याचे सोबत त्यावेळी प्रवास करताना अन्य मायगाव देवी येथील तरुण सुनील गोरख माळी हा असल्याचा सांगितले होते.व त्याबाबत कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कडे न्याय मागितला होता.या प्रकरणी नुकतीच सुनावणी संपन्न झाली असून यात न्या.एस.एम.बन्सोड यांनी फिर्यादी पक्षाचे वतीने बाजू ऐकूण घेतली होती.त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांना सर्व पुराव्यांची शहानिशा करून सि.आर.पी.सी.१५६(३) प्रमाणे गुन्ह्याच्या तपासाचे आदेश दिले असल्याची माहिती गहिनीनाथ घुले यांचे वकील अड्.योगेश खालकर यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close