जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
संपादकीय

‘मिथ्या’ मागील शिवसेना…!

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
   
     कोपरगाव विधानसभा मतदार संघात निवडणूक संपन्न होत असली तरी अद्यापही त्यात रंगत वाढताना दिसत नाही त्यामुळे तालुक्यात आश्चर्य व्यक्त होत असून यात रंगत भरण्यासाठी शिवसेना उबाठा गटाचा उमेदवार आवश्यक होता अशी प्रतिक्रिया मतदारांकडून व्यक्त होत आहे.मात्र त्यांना उमेदवारी मिळण्यात कोण झारीचा शुक्राचार्य आडवा आला याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

   

महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ईशान्य गडाच्या युवराजासह त्यांना दिल्लीत बोलवून त्यांना थेट,”आपकी फाईल मेरे पास आ गई है अगर वो फाईल फिर से (एकनाथ) शिंदे और (अजित) पवार के पास चली जाएगी तो मैं कूछ कर नही पाऊंगा,आप सोच लो क्या करना है ! या सज्जड दमानंतर या परिवाराने थेट थांबण्याचा निर्णय घेतला असल्याची बातमी आहे.

    राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचार पहिल्या टप्प्यात शिगेला पोहोचला आहे.कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायचीच असा निश्चय महाविकास आघाडी आणि महायुतीने केला आहे.ही निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने तर थेट दिल्लीतील नेत्यांना महाराष्ट्रात प्रचारासाठी पाचारण केले आहे.आज महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यांची जाहीर सभा झाली आहे.कोपरगाव येथे आगामी १२ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची जाहीर सभा संपन्न होत आहे.मात्र शेजारी शिर्डी आणि संगमनेर तालुक्यात वातावरण तप्त झाले असून रोज आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे.शेजारी येवला,सिन्नर आणि,वैजापूर तालुका त्याला अपवाद नाही.मात्र कोपरगाव तालुक्यात अद्याप ही थंडथंड-कुलकुल आहे.या मागे अर्थातच उमेदवारी निवडीत झालेली चूक मानली जात आहे.


   कोपरगाव तालुक्यात पारंपरिक कोल्हे आणि काळे ही राजकीय घराणी मातब्बर मानली जात आहे.आजवर पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी आपली राजकीय सत्ता गाजवली आहे.आजही त्यांची प्रचिती येत आहे.यावेळी सलग ५२ वर्षांनंतर खंड पडला आहे.त्याला कारणही तसेच आहे.भाजप महायुती आणि काँग्रेस शिवसेना महाआघाडी यांच्यात सामना होत असून यात अनेकांची उमेदवारी बाबत पंचाईत झाली आहे.त्याला माजी आ.स्नेहलता कोल्हे आणि त्यांचे कुटुंब अपवाद नाही.त्यामागे अर्थातच भाजपची रणनीती महत्वाची मानली जात आहे.त्यांनी त्यांना असे खिंडीत पकडले की;पुढे गेले तर आड आणि मागे गेले तर विहीर अशी त्यांची अवघड अवस्था झाली आहे.त्यामुळे त्यांच्या शिक्षण संस्थेचे दप्तर तपासी संस्था घेऊन गेल्या असल्याने त्याचा अहवाल कधी बाहेर येईल आणि आपण कधी मध्ये जाऊ अशी भीती त्यांना सारखी सतावत आहे.त्यामुळे त्यांना प्रखर इच्छा असूनही ‘पीछे मूड..’ करावा लागला आहे हे कोणा ज्योतिषाने सांगण्याची गरज उरत नाही.असे म्हटले जाते की,वर्तमानात महाराष्ट्र दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ईशान्य गडाच्या युवराजासह त्यांना दिल्लीत बोलवून त्यांना थेट,”आपकी फाईल मेरे पास आ गई है अगर वो फाईल फिर से (एकनाथ) शिंदे और (अजित) पवार के पास चली जाएगी तो मैं कूछ कर नही पाऊंगा,आप सोच लो क्या करना है ! या सज्जड दमानंतर या परिवाराने थेट थांबण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.बाकी राज्यसभा आणि आणि काहीबाही सब बकवास असल्याचे मानले जात आहे.परिणामी तालुक्यात राजकीय असंतुलन निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे.परिणामी या निवडणुकीचा सर्व भार धाकल्या पवारांचे उमेदवार आशुतोष काळे यांचेवर आल्याचे मानले जात आहे.त्यांना योग्य उमेदवार रिंगणात नसल्याने मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली असल्याचे बोलले जात आहे.अर्थातच ही पोकळी मोठ्या विकासाचा अनुशेष वैगरे काही नाही तो आर्थिक असा मानला जात आहे.त्यामुळे प्रत्येक निवडणुकीची टाचा वर करून वाट पाहणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि उंबऱ्याला उशी लावून झोपणाऱ्या (विकावू) मतदारांची मोठी पंचाईत झाली असल्याचे बोलले जात आहे.तर दुसरीकडे आता आशुतोष काळे यांना आता स्वतःच्या पार्टी खेरीज आता समोरच्या थांबलेल्या पार्टीचे कार्यकर्ते सांभाळण्यासह कायम विरोधी गणल्या गेलेल्या सेनेची डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.मात्र थोरल्या पवारांचे उमेदवार मात्र कच्चे ठरताना दिसत आहे.संदीप वपें यांनी कधी बाह्या वर करून आंदोलन केल्याचे कोणालाही स्मरत नाही की तालुक्यातील पाणी वा तत्सम एक प्रश्न घेऊन लढाई केल्याचे व तो तडीस लावल्याचे एकही उदाहरण कोणालाही आठवत नाही.एक हातखंडा त्यांना आहे.नगर परिषदेत आशुतोष काळे यांच्या कृपाशीर्वादाने मिळालेल्या स्वीकृत नगरसेवक पदास न्याय देताना त्यांनी काही प्रश्न अभ्यासपूर्वक मांडले आहे.आधी दिलीप वळसे पाटील आणि नंतर शरद पवार यांच्यावरील निष्ठा हा गुण त्यांच्या ठायी आहे हे निर्विवाद आहे.मात्र यापलीकडे यांचे मोठे कर्तृत्व दिसत नाही.काल परवा पद मिळते काय आणि त्यांना उमेदवारी जाहीर होते काय हे सर्वच आक्रित मानले जात आहे.त्यांना राज्याचे प्रवक्ते पद मिळाल्यावर त्यांनी राज्य सोडा; जिल्हा सोडा; तालुक्यात पदाधिकारी नेमण्यास कार्यकर्ते मिळाले नाही हे विशेष !आजही काल राष्ट्रवादीत सामील झालेले तालुका प्रमुख वगळता कोणी नाव घेण्यासारखा कार्यकर्ता नाही.याची उणीव प्रामुख्याने त्यांना व त्यांच्या थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादी या पक्षास भासत आहे.त्यामुळे त्यांच्या प्रचाराचा सर्व भार उबाठा सेनेवर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर आला आहे हे सांगण्यास कोणा साक्षीदारांची गरज उरत नाही.त्यामुळे महाआघाडीने त्यांना दिलेली उमेदवारी ही आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडल्यासारखी झाली आहे.मात्र ज्या शिवसैनिकांनी आपल्या जीवाचे रान केले ते मात्र अक्षरशः हात चोळीत बसले आहे.त्यांची दखल ना वरिष्ठ नेत्यांना घ्यावी वाटली ना दुसऱ्या फळीतील नेत्यांना.परिणाम असा झाला की,”त्यांनी जुलै महिन्याच्या शेवटी बैठक घेऊनही व एकमुखाने त्यांनी माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांचे नांव अंतिम करूनही त्यांच्या हाती काही पडले नाही.त्यामुळे तालुक्यात हा एक चर्चेचा विषय बनून राहिला आहे.त्यामुळे आज त्यांना राजकीयदृष्ट्या अल्प आयुष्य असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सेवा चाकरी करण्याची नामुष्की ओढवली आहे.या सारखे त्यांच्यासाठी मोठे दुर्दैव नाही.

   

कोपरगाव तालुका शिवसेनेने विधानसभा उमेदवारीसाठी आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या एकमुखी नावाचा प्रस्ताव सदर पदाधिकारी यांचेकडे दिला होता.मात्र जिल्हा पातळीवरून एका पदाधिकाऱ्याने सदर प्रस्ताव श्रेष्ठीकडे न पाठवता तसाच दडवून ठेवला होता.त्यामुळे चाळीस वर्षात एका शिवसैनिकाचे आमदार होण्याचे एका झारीतील शुक्राचार्यामुळे भंग पावले आहे.

  दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार त्यात उबाठा सेनेच्या एका जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची भूमिका शुक्राचार्याची ठरली असल्याची माहिती मिळाली आहे.कोपरगाव तालुका शिवसेनेने आपले माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे यांच्या एकमुखी नावाचा प्रस्ताव सदर पदाधिकारी यांचेकडे दिला होता.मात्र त्याने सदर प्रस्ताव तसाच दडवून ठेवला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.परिणाम असा झाला की ऊबाठा सेनेचे झावरे यांचे नाव त्या पक्षाची तिकीट वाटप समितीवर काम करणारे नेते खा.संजय राऊत आणि खा.अनिल देसाई यांचेकडे निर्धारित वेळेत पोहचले नाही परिणामी त्यांची मागणी पक्षाकडे  नोंदवली नाही.त्यामुळे उमेदवारीची चाळीस वर्षात प्रथम आलेली वाढी ऊबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांना लाभली नाही परिणामी त्यांना त्यापासून वंचित राहावे लागले आहे आणि आज उबाठा सेनेला तुलनेने आंदोलन आणि चळवळीचे मोठे वलय नसलेल्या उमेदवाराचे काम करण्याची नामुष्की ओढवली आहे.त्यामुळे आज काहीही फायदा नसताना त्यांना दाती तृण धरून पळावे लागत असून आगामी २३ नोव्हेंबर नंतर ही मंडळी सेनेबरोबर खरच राहील का ? असा सवाल निर्माण होणार आहे.कारण राज्याचे राजकीय चित्र आजच्या इतके कधीच अस्थिर नव्हते.त्यामुळे आज एकत्र निवडणूक लढवणारे त्यानंतर एकमेकाचे कट्टर शत्रू बनु शकणार आहे त्यामुळे सेनेच्या हाती लंगोट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.ज्या वेळी एखाद्या वस्तूला सत्य मानले जाते परंतु प्रत्यक्षात तिचे अस्तित्व नसते त्यावेळी तिला ‘मिथ्या’ म्हणतात अशा ‘मिथ्या’च्या मागे धावण्याचे आणि दुधातील माशी सांभाळण्याचे काम ऊबाठा सेनेच्या भाळी आले आहे इतकेच !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close