Uncategorized
आत्मा मालिकमध्ये इन्स्पायर अर्वाड प्रदर्शनास उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
तीन दिवषीय इन्स्पायर अर्वाड विज्ञान प्रदर्शनास कोकमठाण येथील आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल येथे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे. यामध्ये प्रदुषण मुक्ती, सौर ऊर्जा, पर्यावरण संरक्षण, मानव विकासास सहाय्यभुत ठरणारी उपकरणे मांडण्यात आली होती.
नवी दिल्ली येथील केंद्र सरकारचा विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपुर व माध्यमिक शिक्षण विभाग अहमदनगर, आयोजित या प्रदर्शनात अहमदनर व सोलापुर जिल्हयातील २८९ उपकरणे मांडण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमास जिल्हा बॅंकेच्या संचालिका चैताली काळे, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब गोर्डे, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपुरच्या मनिषा भडंग, जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी दिलीप थोरे, गटशिक्षणाधिकारी पोपट काळे, विद्यालयाचे प्राचार्य निरंजन डांगे, विस्तारधिकारी राजेंद्र पवार, शबाना शेख, शैलेजा चांदेकर, मिनाक्षी पेंडभाजे आदि उपस्थित होते.
सदरचे प्रदर्शन २८ डिसेंबर पर्यंत सुरु होते. प्रदर्शनास परमानंद महाराज,निजानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, उपाध्यक्ष भगवानराव दौंड, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, वसंतराव आव्हाड, प्रभाकर जमधडे, माधवराव देशमुख यांनी भेट देवून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी प्राचार्य निरंजन डांंगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, पर्यवेक्षक रविंद्र देठे, बाळासाहेब कराळे व शिक्षक परिश्रम घेतले आहे.