कोपरगाव तालुका
तीन जानेवारी पासून कोपरगावात गोदाकाठ महोत्सव
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रियदर्शनी महिला मंडळाच्या वतीने सालाबादा प्रमाणे याही वर्षी “गोदाकाठ महोत्सव-२०२० “चे आयोजन येत्या नववर्षात ३ जानेवारी दुपारी ३ वाजता महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे करण्यात आले असून त्याचे उदघाटन तालुक्याचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने आमच्या प्रतिनिधीस देण्यात आली आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यातील शेतकरी,नागरिक व्यापारी ,तरुण यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व त्याचा वापर दैनंदिन जीवनात करून आपला उत्कर्ष साधावा या साठी या गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन गत अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे.त्यात कृषी प्रदर्शन,सांस्कृतिक कार्यक्रम,खाद्य पदार्थांची विक्री व प्रदर्शन,बचत गटांच्या मालाचे प्रदर्शन व विक्री आदी उपक्रम राबविण्यात येत आहे.हे प्रदर्शन पाच जानेवारी पर्यंत तीन दिवस चालणार आहे. या प्रदर्शनाचा कोपरगाव शहर व तालुक्यातील शेतकरी, नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी शेवटी केले आहे.