जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अवकाळीपावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ८.२८ कोटीची मदत

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव ( प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यात ऑक्टोबर- नोहेंबर महिन्यात आलेल्या चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेती पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची प्राथमिक स्वरूपातील मदत म्हणून कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना ८.२८ कोटी ची मदत जाहीर झाली असून हि नुकसान भरपाईची रक्कम लवकरच थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खूप मोठे असून मिळालेली मदत त्याप्रमाणात कमी असून सरकार स्थापन होताच शासनाकडे शेतकऱ्यांना अजून मदत मिळावी यासाठी मागणी करणार असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे.

गत ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाचा मोठा तडाखा कोपरगाव तालुक्यातील शेती क्षेत्राला बसला होता. त्यामुळे काढणीला आलेल्या बाजरी, मका, कापूस, सोयाबीन आदि पिकांसह चारा पिके व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती.

शेती क्षेत्राच्या झालेल्या नुकसानीची गंभीरपणे दखल घेऊन सदर मागणीस जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन नुकसान झालेल्या सर्वच शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. पंचनामे झालेल्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे. नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होणार असून या नुकसान भरपाईच्या रक्कमेतून बँकेकडून कोणत्याही प्रकारची वसुली केली जाणार नाही. शेतकऱ्यांना अजून मदत मिळावी यासाठी माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मागील काही वर्षापासून शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत असून यावर्षी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सर्वस्व हिरावून घेतले आहे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खूप मोठे आहे. झालेल्या नुकसानीमुळे रब्बीच्या हंगामाची तयारी कशी करायची हा शेतकऱ्यांपुढे मोठा यक्ष प्रश्न होता.त्यासाठी केंद्र शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी अशी मागणी केली आहे. पवार यांच्या मागणीची पंतप्रधानांनी तातडीने दखल घेतली आहे त्यामुळे राज्यासह कोपरगाव तालुक्यातील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान पाहता केंद्र शासनाकडून अजून मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. अवकाळी पावसामुळे सर्वच शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे जमीन महसुलात सुट देण्यात आली असून शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्यात आले असल्याचेही आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close