जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आमदार आशुतोष काळेंची “रास्ता रोको” आरोपातून मुक्तता

जाहिरात-9423439946

संपादक -नानासाहेब जवरे

कोपरगाव -(प्रतिनिधी )

कोपरगाव मतदार संघातील पाणीप्रश्न व दूध व्यवसायाच्या बाबतीत दिनांक १३ मे २०१५ रोजी नगर-मनमाड महामार्गावर साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आशुतोष काळे यांच्यासह कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात संदीप वर्पे, सुनील गंगुले, कारभारी आगवण, संभाजी काळे, फकीर महम्मद कुरेशी, संतोष चवंडके, कृष्णा आढाव, बाळासाहेब बारहाते, संजय रोहमारे, दिनार कुदळे, अॅड. योगेश खालकर, सुभाष कुलकर्णी, गोरक्षनाथ रोकडे, मच्छिंद्र रोहमारे, राजेंद्र निकोले आदी कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गु.र.नं. ९३/२०१५ प्रमाणे भा.द.वि. कलम १४३ व ३४१ मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी नुकतीच पूर्ण होऊन आमदार आशुतोष काळेंसह सर्व कार्यकर्त्यांची न्यायमूर्ती व्ही.यु. मिसाळ यांनी निर्दोष मुक्तता केली आहे.

कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा पाणीप्रश्न बिकट झाला होता. दूध व्यवसाय अडचणीत आला होता त्यावेळी कोपरगाव मतदार संघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व मोडकळीस आलेल्या दुग्ध व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी १३ मे २०१५ रोजी नगर-मनमाड महामार्गावर साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे बहुसंख्य कार्यकर्त्यांसह रस्तारोको आंदोलन केले होते. त्या विरोधात आशुतोष काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर खटला दाखल करण्यात आला होता. जवळपास चार वर्ष या खटल्याची सुनावणी सुरु होती. या प्रकरणाचा साडे चार वर्षांनी निकाल लागल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही आशुतोष काळे यांनी जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आवाज उठविला होता.२०१५ साली कोपरगाव विधानसभा मतदार संघाचा पाणीप्रश्न बिकट झाला होता. दूध व्यवसाय अडचणीत आला होता त्यावेळी कोपरगाव मतदार संघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी व मोडकळीस आलेल्या दुग्ध व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी शासनाचे लक्ष वेधले जावे यासाठी १३ मे २०१५ रोजी नगर-मनमाड महामार्गावर साईबाबा कॉर्नर कोपरगाव येथे बहुसंख्य कार्यकर्त्यांसह रस्तारोको आंदोलन केले होते. त्या विरोधात आशुतोष काळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर खटला दाखल करण्यात आला होता. जवळपास चार वर्ष या खटल्याची सुनावणी सुरु होती. यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यास आरोपींचे वतीने अॅड. एस.व्ही. खालकर यांनी बाजू मांडताना सदर गुन्हा हा केवळ राजकीय हेतूने दाखल केला असून नागरिकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबधित आरोपी हे पोलीस ठाण्याकडे जात असतात. त्यामुळे पोलिसांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी खोट्या स्वरूपाचा गुन्हा आरोपी विरुद्ध दाखल केला होता. आरोपी यांच्या विरुद्ध कुठलाही ठोस पुरावा समोर आलेला नाही पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा तपास न करता विनाकारण आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे देऊन न्यायालयापुढे युक्तिवाद केला. न्यायमूर्ती व्ही.यु. मिसाळ यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरून आमदार आशुतोष काळेंसह सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती अॅड. एस.व्ही. खालकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. या खटल्यात अॅड. आर.पी.दुशिंग व अॅड.राहुल वाकचौरे यांनी त्यांना साहाय्य केले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निकालाचे स्वागत केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close