Uncategorized
बाह्य सौंदर्यापेक्षा पेक्षा अंतरंगातील सौंदर्य महत्वाचे -.चैताली काळे
कोपरगाव(प्रतिनिधी)शालेय विद्यार्थिनींनी बाह्य सौंदर्यापेक्षा आपल्या अंतरंगातील सौंदर्याची काळजी घ्यावी. असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील ग.र. औताडे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व जवळके येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास वेंडिंग मशीन भेट देण्यात आले.याप्रसंगी आरोग्य व स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, पंचायत समिती सभापती अनुसया होन, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे, दिलीप औताडे, शोभाताई रोहमारे, रोहिदास होन, जवळकेचे सरपंच बाबुराव थोरात, लक्ष्मण थोरात, देवेन रोहमारे, सचिन मुजगुले, गोरख जाधव, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, नरहरी रोहमारे, संतोष वाके, प्राचार्य गमे, दत्तात्रय सोनवणे, शिक्षक स्नेहल मोरे, शिंदे, पालक व विद्यार्थिनी उपस्थित होते.
त्यावेलींपुढे बोलताना म्हणाल्या की,अस्वच्छतेचा आरोग्यावर मोठा दुष्परिणाम होत असतो. शिक्षण घेत असतांना मुलींना आपल्या आरोग्याच्या बाबतीत अनेक अडचणी येत असतात. या अडचणी काही प्रमाणात दूर करण्याच्या प्रयत्नातून कोपरगाव तालुक्यातील सर्वच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या आरोग्यासाठी वेंडिंग मशीन भेट दिले असून या वेंडीग मशीनचा विद्यार्थिनींनी उपयोग करावा आज विद्यार्थिनी आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही. त्यामुळे भविष्यात मोठ्या व्याधींचा सामना करावा लागू शकतो. आरोग्याच्या दृष्टीकोनातून स्वच्छता अतिशय महत्वाची असून आपल्या आरोग्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. विद्यार्थिनींना काही गोष्टींची माहिती नसल्यामुळे विद्यार्थिनी नेहमीच मानसिक तणावाखाली राहतात. एकीकडे अभ्यासाची जबाबदारी व दुसरीकडे अर्धवट माहितीमुळे आजार जडतात व त्यामुळे स्वप्नं भंग होऊ शकतात त्यासाठी आरोग्याविषयी जागरूक राहा असा सल्ला त्यांनी यावेळी उपस्थितीत विद्यार्थिनींना दिला. वेंडिंग मशीन उपक्रमाबाबत विद्यार्थिनीं व त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त करून चैताली काळे यांचे आभार मानले.
फोटो ओळ – येथील ग.र. औताडे पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व जवळके येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयास वेंडिंग मशीन भेट देण्यात आले.याप्रसंगी बोलतांना चैताली काळे, समवेत सभापती अनुसया होन, दिलीप औताडे,अशोक रोहमारे, संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे.आदी मान्यवर