जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दशनाम गोसावी समाजाला दफनविधीसाठी जागा द्या-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

दशनाम गोसावी समाजाला दफनभूमीसाठी स्वतंत्र जागा आवश्यक असल्याने कोपरगाव नगरपालीकेने शहराच्या हद्दीत अशी जागा द्यावी अशी मागणी समाजाच्या वतीने कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांचेकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.

दशनाम गोसावी समाजाचे पूर्वापार कोपरगाव शहरात तसेच ग्रामिण भागात वास्तव्य असुन परंपरेप्रमाणे गोसावी समाजात मृत्यूनंतर प्रथेप्रमाणे दफनविधी केला जातो त्यास समाधी देणे असे म्हणतात.तसेच गोसावी समाजासोबतच जंगम,लिंगायत,नीलकंठ,वाणी बुरुड या समाजात देखील मृत्यूनंतर दफन करण्याची म्हणजेच समाधी देण्याची प्रथा असल्याने सर्व समाजाची वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्व समाजासाठी कोपरगाव शहरात सध्या एक ददफनभूमी असून ती पुरेशी नसल्याचे या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हिंदुस्थानात बुद्धाच्या वेळी लोकांना वैदिक यज्ञयागाचा कंटाळा आला होता. म्हणून त्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार झपाट्याने झाला.त्यानंतर तर्कशास्त्र व बौद्धिक विचारांचा फैलाव झाला. हा प्रकार हजार बाराशे वर्ष चालल्यानंतर तर्कशास्त्रावर आधारित धर्म ज्ञानापेक्षा पुन्हा शुद्ध प्रमाणाकडे प्रवृत्ती झाली. पूर्वमीमांसेने शुद्ध प्रमाणाचे नियम घालून दिले व आदि शंकराचार्यांनी त्या नियमांस अनुसरून वेदान्त शास्त्र तयार केले.त्यामुळे सनातन वैदिक धर्माची स्थापना झाली व लोकांची चंचल वृत्ती स्थिर होऊन ब्रह्मज्ञानाकडे लक्ष लागले.आचार्यांचा अद्वैतवाद व मायावाद यांनी राष्ट्रात विलक्षण क्रांती घडून आणली.आचार्यांनी हे महत्त्वाचे कार्य अगदी बालवयापासून हाती घेतले. वैदिक धर्माच्या स्थापनेकरिता त्यांनी सर्व हिंदुस्थानभर प्रसार केला.मुख्य चार दिशांना चार मठ स्थापन केले. पूर्वीचा विस्कळीत गोसावी समाज नियमबद्ध केला.आपल्या शिष्यांपैकी अधिकारी विद्वानांची या पीठांवर स्थापना केली.आणि सर्वत्र अद्वैत मतांचा प्रसार केला.हे कार्य करण्यास शंकराचार्यांना गिरी,पुरी व भारती या शिष्यांचे फार साहाय्य झाले. इतरांप्रमाणे गृहस्थ-गोसावी हे आचार्यांचे शिष्य झाले,आणि त्यांनी आचार्यांचा अद्वैत संप्रदाय उचलला.मात्र आज या समाजाबद्दल फारशी माहिती नागरिकांना दिसत नाही.त्यामुळे गैरसमजच अधिक प्रचलित झालेला दिसतो.ई.स.३०० च्या सुमारास बुंदेलखंड,पंजाबात गोसावी समाजाचे राजे होऊन गेल्याचा नोंदी प्राचीन इतिहासात आढळतात.आज त्यांच्या वाट्याला उपेक्षित जिणे आले आहे.कोपरगाव शहर व तालुक्यातही त्याचा अपवाद नाही.त्यामुळे शहरात आज या समाजाला स्वतंत्र दफनभूमी नाही.मृत व्यक्तीला या समाजात दफन करण्याची परंपरा आहे.त्या मुळे या समाजाला स्वतंत्र दफन भूमी असायला हवी या विचाराने चांगलेच बाळसे धरले आहे.दशनाम गोसावी समाधी बचाव संघटनेचे संस्थापक तपोनिधी चंद्रकांत गिरी व अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कोपरगाव तालुका अध्यक्ष वाल्मिक लक्ष्मणगिरी गोसावी,उपाध्यक्ष ऋषिकेश जितेंद्र गोसावी,कोपरगाव तालुकापुर्व संघटक दिगंबर पुरी कोपरगाव तालुका पश्चिम उपसंघटक संजय भारती,प्रताप गोसावी आदिच्या उपस्थितीत या मागणीचे निवेदन कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सरोदे यांना देण्यात आले आहे.

या निवेदनावर सुहास गोसावी,हेमंत गोसावी,महेश गोसावी,गौरव कोऱ्हाळकर,नंदन वाघमारे,शुभम भावसार,आदींच्या सह्या आहेत.
या समाजाची वाढती लोकसंख्या विचारात घेता सर्व समाजासाठी कोपरगाव शहरात सध्या दफनभूमी साठी एकच जागा असल्याने जर अगोदर एका जागेवर दफनविधी केलेला असेल तर त्याच जागेवर दुसरा कोणी दफनविधी न करण्याची प्रथा आहे परंतु दफनभूमी साठी जागा कमी असल्याने हे शक्य होतांना दिसत नाही.या करिता महाराष्ट्र शासनाचा दि.१७ एप्रिल २००४ ग्रामविकास व जलसंधारण विभाग मंत्रालय मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रत्येक गावात स्वतंत्र दफनभूमी साठी जागा उपलब्ध करून द्यावी असा शासन निर्णय असून त्या नियमानुसार कोपरगाव नगरपालिकेने नगरपालिका हद्दीत गोसावी समाजाच्या दफनभूमी करीता जागा आरक्षित करून त्या जागेचा समाजास दफनभूमी करीता वापर करण्याची परवानगी द्यावी जर अशी जागा उपलब्ध झाली नाहीच तर नगरपालिकेने महाराष्ट्र शासनाकडे जागा मिळवण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करून जागा उपलब्ध करून द्यावी अशी विनंती दशनाम गोसावी समाज बचाव समिती चे कोपरगाव तालुका अध्यक्ष वाल्मिक गोसावी यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close