जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’ त्या’ अपात्रतेबाबत सुनावणी संपन्न,उद्या निकाल,शहराचे लक्ष लागून !

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

    राज्यात लक्षवेधी ठरणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे आणि त्यांच्या माजी आ.गटाचे अन्य तीस नगरसेवक पदाचे उमेदवार अशा एकूण 31 उमेदवारांच्या अपात्रतेबाबत कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात त्यांच्या याचिका दाखल झाली असून त्याबाबत आज दिवसभर न्या.डी.डी.अलमले यांचे न्यायालयात सुनावणी संपन्न झाली असून उद्या त्यासंबंधी निकाल घोषित होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे.त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार जीव मुठीत धरून बसले असल्याचे चित्र आज दिवसभर दिसून आले आहे.याबाबत शहरात सर्वत्र उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

  

दरम्यान या प्रकरणात आ.आशुतोष काळे यांच्या गटाचे सदोष शपथपत्रामुळे जिल्हा व सत्र न्यायालयात मोठा काथ्याकूट झाला असून नगराध्यक्ष आणि अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा मोठा वेळ वाया गेला असून त्यांना मोठा मनस्ताप उमेदवारांना सहन करावा लागला आहे.परिणामी सदर सदोष शपथपत्र नेमके कोणत्या वकिलांने केले आहे याबाबत शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

      राज्यात एकूण २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींसाठी ०२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे.तर उमेदवारी मागे घेण्याची 21नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती.तर ०३ डिसेंबर रोजी मतदानाचे निकाल जाहीर होणार आहे.त्यामुळे राज्यातील मतदारांचे या तारखेकडे लक्ष लागून राहिले आहे.कोपरगाव नगरपरिषद हद्दीत वेगळी स्थिती नाही.या ठिकाणी बहुरंगी लढत होणार असल्याचे उघड झाले आहे.भाजप निष्ठावान गटाचे अपक्ष उमेदवार व माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,वर्तमानात कोल्हे गटाचे उमेदवार पराग संधान,राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे,शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार सपना मोरे,शिंदे सेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आदी तर उघड उघड एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेच पण अपक्ष उमेदवार दिपक वाजे यांनी कोल्हे गटाची धाकधूक वाढवली आहे.त्यांच्या माघारीसाठी ईशान्यगडाच्या युवराजांनी मोठी मेहनत घेऊनही ती सपशेल वाया गेली असून शेवटी त्यांना बिगर चपलाचे पळावे लागले असल्याचे उघड झाले आहे.आ.काळे गटाने त्यांची वेगळी पाहुणचार व्यवस्था केल्याने इकडे टाचा वर करूनही ईशान्य गडाच्या युवराजांच्या उपयोग झाला नाही.त्याबाबत आ.काळे गटाचे डावपेच उजवे पडले असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचे उमेदवार पराग संधान व राष्ट्रवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे.

 

दरम्यान या सूनावणीबाबत जिल्ह्याचे लक्ष लागून असून या बाबत जिल्हा व सत्र न्यायालयात आज दिवसभर काथ्याकूट झाला असून त्या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असल्याची माहिती हाती आली आहे.याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी.अलमले आपला निकाल उद्या जाहीर करणार असल्याचे समजत आहे.

     दरम्यान दुसरीकडे सत्ताधारी आ.आशुतोष काळे गटास पायखुंटी घालण्यासाठी माजी आ.कोल्हे गटाने कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात एक अपील करून छाननीत घोळ झाला असल्याचा मुद्दा उघडकीस आणलां आहे.याबाबत आमच्या ‘ न्यूजसेवा ‘ वेब पोर्टलने दोन दिवसापूर्वी ही बातमी सर्वप्रथम उघड केली होती.याबाबत अड.जयंत जोशी यांनी जोरदार युक्तिवाद केला असून त्यांनी,”प्रतिवादीचे उमेदवार ओमप्रकाश कोयटे व त्यांचे अन्य तीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांनी दिनाक 15 नोव्हेंबर रोजी ऍड.विद्यासागर शिंदे यांचे समोर जे शपथ पत्र दाखल केले आहे त्या शपथपत्राचे शेवटी सह्या केलेल्या नाही,दरम्यान त्यावेळी ऑनलाईन प्रक्रिया बंद पडली होती.त्यावेळी ऑफलाईन परवानगी दिली होती.दाखल शपथ पत्रात शेवटी सह्याच केलेल्या नाही,सर्व मजकूर भरला नव्हता तो नंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी कायद्याविरूध्द जावून भरला असल्याचा आरोप करून त्यावर हरकत घेतली होती,शपथ पत्र भरल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुसऱ्या दिवशी त्यात बदल अथवा खाडाखोड करता येत नाही.मात्र नेमकी तीच घटना घडल्याने ते अर्ज बाद करण्याची गरज होती.मात्र त्याकडे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप केला आहे.पुढे त्यांनी ,”त्याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने निवडणूक आयोगाला तसे नियम बनवायला भाग पाडले आहे.मात्र त्यांची निवडणूक अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली नसल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले आहे.या प्रक्रियेत केवळ पराग संधान व राजेंद्र झावरे या दोन उमेदवारांचे अर्ज वगळता अन्य उमेदवारांसह अर्ज सदोष आहे.ते अपात्र ठरवणे गरजचे होते.मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.निवडणूक छाननीत आक्षेप नसताना ते अपात्र ठरवणे अधिकाऱ्यांचे काम होते.ते कर्तव्य त्यांनी चोख पार पाडले नाही.ज्या उमेदवाराच्या सह्या नाही असे शपथपत्र अपात्र करणे गरजेचे असताना ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केले नाही असा युक्तिवाद केला आहे. व नगराध्यक्ष उमेदवार ओमप्रकाश कोयटे आणि त्यांचे अन्य सहकारी नगरसेवक पदाचे तीस उमेदवार आदींचे अर्ज बाद करावे असे मुद्दे न्यायालयासमोर उपस्थित केले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

  दरम्यान प्रतिवादी राष्ट्रवादीच्या वतीने छ.संभाजीनगर येथून खास सुनावणीसाठी निमंत्रित केलेले ज्येष्ठ वकील कातनेश्र्वर गाडे यांनी काम पाहिले असल्याची माहिती आहे त्यांनी,” विरोधी (पराग संधान )सदस्यांनी तसा कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता असा दावा केला आहे.सही नसणे ही मानवी चूक आहे.म्हणून त्याला नैसर्गिक रित्या निवडणूक लढविण्यास प्रतिबंध करता येणार नाही” असा दावा केला आहे.त्याबाबत आज दिवसभर काथ्याकूट झाला असून त्या प्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असल्याची माहिती हाती आली आहे.याबाबत जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी.अलमले आपला निकाल उद्या जाहीर करणार असल्याचे समजत आहे.

कोपरगाव नगरपरिषद.

   

दरम्यान कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांचा हा चांगलाच कटू अनुभव आल्याने त्यांचे चेहरे चांगलेच उतरलेले दिसत होते.त्यामुळे ते आज दिवसभर कोपरगाव जिल्हा आणि सत्र न्यायालयात ठाण मांडून बसले होते.आता त्यांचे लक्ष उद्याच्या निकालाकडे लागले आहे.

   दरम्यान या प्रकरणी सरकारी पक्षाचे वतीने अभियोक्ता ऍड.अशोक वहाडणे,प्रदीप रणधीर यांनी काम पाहिले आहे.तर प्रतिवादी विरूध्द ऍड.जयंत जोशी यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे.मात्र यात ईशान्य गडास जास्त काही साध्य होण्याची शक्यता असल्याचे दिसत नाही.उद्या सकाळी 11 वाजेनंतर याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयात आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

   दरम्यान या प्रकरणात आ.आशुतोष काळे यांच्या गटाचे सदोष शपथ पत्रामुळे जिल्हा व सत्र न्यायालयात मोठा काथ्याकूट झाला असून नगराध्यक्ष आणि अन्य उमेदवारांच्या प्रचाराचा मोठा वेळ वाया गेला असून त्यांना मोठा मनस्ताप उमेदवारांना सहन करावा लागला आहे.परिणामी सदर सदोष शपथपत्र नेमके कोणत्या वकिलांने केले आहे याबाबत शहरात आणि अजित पवार राष्ट्रवादी गटात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close