Uncategorized
मळगंगा देवीच्या मुखवट्याचे काम युध्द पातळीवर सुरु
मुंबई येथील सराफ यतीन पंचाल यांची माहिती
- निघोज प्रतिनिधी दी. 16 मार्च
राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या मळगंगा देवीच्या गाभाऱ्यातील मखर व ईतर दागीणे तयार करण्याचे काम गोरेगाव (मुंबई) यतीन पंचाल यांनी केले आहे. साधारण यासाठी 43 किलो चांदी लागली असून मजूरीसहीत एकून रक्कम 22 लाख रुपये खर्च झाला आहे. लोकसहभागातून तसेच भावीकांनी दिलेल्या देणगीतून हे काम झाले आहे. मुंबई येथील सराफ यतीन पंचाल यांनी राज्य तसेच परराज्यातील अनेक मंदीराचे मखर तसेच मुखवटे सोन्याचांदीचे दागीणे तयार केले असून त्यांचा याबाबत देशात नावलौकीक झाला आहे. या मखर व ईतर दागीण्यांमुळे देवीचा गाभारा अतिशय आकर्षक दिसत आहे येत्या महिनाभरात देवीचा चांदीचा मुखवटा व सोन्याचा अरक ( गोल्ड) तयार करण्याचे काम सुरू आहे.
यावेळी मुंबईचे सराफ यतीन पंचाल यांचा सत्कार मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे जेष्ठ विश्वस्थ नानाभाऊ वरखडे, बबनराव ससाणे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब लामखडे सुनिती ज्वेलर्सचे मालक गणेश कटारिया तसेच भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
चौकट
गेली सहा महिन्यापासून मळगंगा देवीच्या गाभाऱ्यातील मखर व ईतर दागीणे तसेच मुखवट्याचे काम सुरू असून यासाठी तीस लाख रुपये खर्च होणार असून भाविकांनी यासाठी पंचवीस लाख रुपये वर्गणी जमा झाली आहे. यासाठी भावीकभक्तांनी मोठय़ा प्रमाणात देणगी देण्याचे आवाहन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रभाकर कवाद, ऊपकार्याध्यक्ष शांताराम मामा लंके, कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके, सचिव शांताराम कळसकर तसेच विश्वस्थ मंडळ निघोज व मुंबई कुलाबा ग्रामस्थांनी केले आहे.या देणगीदात्यांचे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या वतीने आभार
मानण्यात आले आहे.
जाहिरात-9423439946