जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कामगार जगत

राज्यातील नेत्यांनी एस.टी.आंदोलनाबाबत दुटप्पीपणा बंद करावा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

दिल्लीत शेतकरी आंदोलनास भेट देताना आधी मागण्या मान्य करा म्हणणारे महाराष्ट्र राज्यातील नेते राज्य परिवहन मंडळाच्या आंदोलनातं मात्र आधी कामावर हजर व्हा असे सांगताना त्यांचा दुटप्पीपणा एस.टी.कामगारांनी लक्षात घेऊन आगामी रणनीती तयार करावी असे आवाहन कोपरगाव नगर परिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“राज्य परिवहन मंडळाच्या कोपरगाव बस आगाराचे काम समाप्त होत आले आहे.त्यात अधिकची भर घालून सर्व बाजूंनी व्यापारी जवळपास दीड-दोनशे गाळे बांधून त्याचे व्यापारी संकुल तयार करून त्यातील पन्नास टक्के गाळे हे कोपरगाव शहरातील विस्थापितांना तर पन्नास टक्के हे एस.टी.कर्मचारी कुटुंबातील सदस्यांना द्यावे”-विजय वहाडणे,नगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

एस.टी.कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज नववा दिवस आहे.एस.टी.च्या शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचारी दहा दिवसांपासून कामबंद आंदोलन करत आहेत.मागील नऊ दिवसांपासून कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत.पण अद्यापही तोडगा न निघाल्यानं कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत कोपरगाव बस आगारही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरातील बस स्थानकातही आंदोलन सुरु असून त्यावर आजही आंदोलक ठाम असून आज या आंदोलनस्थळी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी भेट दिली त्या वेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कोपरगाव शहर भाजपचे माजी अध्यक्ष विनायक गायकवाड,माजी सरचिटणीस योगेश वाणी,माजी नगरसेवक संजय कांबळे,वसंत जाधव आंदोलक कर्मचारी उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,एस.टी.कामगार प्रामाणिक असून त्यांना त्यांच्या कष्टाचा व कामाचा मोबदला मिळत नाही.इकडे घरकाम करणारी महिला दिवसाकाठी पाचशे रुपये मिळवते मात्र एस.टी.कर्मचारी रात्रंदिवस काम करूनही त्यांना वेठबिगार समजून वागणूक दिली जात आहे.त्यानां किमान राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला तर वेतनात वाढ होईल व चांगले जीवन जगता येईल मात्र हा सामान्य विचार सत्ताधाऱ्यांना शिवत नाही हे विशेष ! आज पर्यंत हे आंदोलन शांततेत सुरु आहे.मात्र जर शासनाला जर शांततेची भाषा कळत नसेल तर त्यांना आक्रमकपणे आंदोलन करून उत्तर देण्याची गरज निर्माण झाली आहे.कर्मचाऱ्यानी तहसील कार्यालयावर मोर्चा काढावा आपला त्यासाठी पाठिंबा आहे.मात्र आपल्या नावाची अनेकांना पोटदुखी आहे.त्यामुळे हे नियोजन तुम्ही करून त्यात आपण सामील व्होऊ असे आश्वासन त्यांनी दिले आहे.कोपरगाव येतील सहा कर्मचारी बडतर्फ केल्याचे आपल्याला समजले आहे.हि बाब धक्कादायक असून सर्वच कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सदर प्रसंगी कर्मचारी देवदत्त आंदुरे यांनी कोपरगाव बस आगारातील सहा कर्मचारी बडतर्फ झाल्याचे सांगितले असून कर्मचारी हादरणार नाहीत व विलीनीकरणाचा लढा असाच पुढे चालू राहील असा विश्वास व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close