जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलगी पळवली,कोपरगावात आरोपी जेरबंद

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील अल्पवयीन मुलगी त्याच गावातील आरोपी गणेश प्रकाश जुंधारे (वय-२४) याने पळवली असून या प्रकरणी आरोपीस कोपरगाव तालुका पोलिसानी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी हि मुलगी दोन महिन्यापासून परागंदा होती.या बाबत मुलीच्या पित्याने दोन महिन्यांपूर्वी मुलगी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवली असल्याची तक्रार दाखल केलेली होती.

दरम्यान काही दिवसापूर्वी सदर गायब मुलगी हि कोल्हापूर जिल्ह्यात एक तरुणा बरोबर असल्याची कुणकुण मुलीच्या पित्यास लागली होती.त्यांनी आधीच आपली मुलगी गायब असल्याची तक्रार दाखल केली असताना.त्यांनी याबाबत अधिकची माहिती पोलिसांना दिली होती.त्यानुसार केलेल्या कारवाईत आरोपीस जेरबंद केले आहे.पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील अल्पवयीन मुलगी दि.१५ सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजेच्या सुमारास गायब झाली होती.याबाबत मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध अज्ञात कारणासाठी आपली मुलगी फूस लावून पळवली असल्याची तक्रार दाखल केली होती.मात्र त्यात आरोपी कोण हे माहिती नव्हते.

दरम्यान कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी त्वरेने हालचाल करून सम्बधित आरोपीचा माग काढला होता.त्यानुसार पोलीस हे.कॉ.ए.व्ही.गवसने व त्यांच्या पोलीस पथकास पाचारण केले होते.त्यांनी सदर तरुणी व आरोपी यांना कोल्हापुर जिल्ह्यातील शिरगाव कण्हेरवाडी फाट्यावर जयहिंद हॉटेल समोर असलेल्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर दोघे राहत होते.त्या ठिकाणी पहाटेच्या सुमारास छापा टाकला असता ते दोघे त्या ठिकाणी आढळून आले होते.त्यांना पोलीस पथकाने आपल्या ताब्यात घेऊन कोपरगाव कडे प्रयाण केले होते.व काल सकाळी याठिकाणी सम्बधित मुलगी हि पोलीस ठाण्यात हजर केली होती.दरम्यान मुलीचे आई-वडील यांना पाचारण केलेले होते.त्या ठिकाणी महिला पोलीस अंमलदार ए.टी.भांगरे गायब मुलीचे आई,वडील यांचे समक्ष सर्व सोपस्कार करून एस.ओ.पी.च्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करून तिचे जबाब नोंदविण्यात आले आहे.त्यात तिने आपले इच्छेविरुद्ध बळजबरीने शरीर संबंध केल्याचा आरोप केला आहे.अशी हकीगत नोंदविण्यात आली आहे.

दरम्यान या घटनेत कोपरगाव तालुका पोलिसांनी आधीच आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३३८/२०२१ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला होता.त्यात वाढ करून पोलिसांनी भा.द.वि.कलम ३७६,(२)(आय),लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलंम ४,८,१२ हे वाढीव कलम लावण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस करत आहेत.या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close