जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावातील व्यापाऱ्यांची मोठी फसवणूक,गुन्हा दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील इंदिरापथ येथील भुसार मालाचे व्यापारी सुनील गोकुळचंद कोठारी (वय-६१) यांची नगर येथील आरोपी विनय रत्नाकर माचवे व मे.रविकिरण पोल्ट्री फार्म रा.बारादरी ता.जि.अ.,नगर यांनी सन-२०१५ ते सण-२०१९ दरम्यान सोयाबीन,ज्वारी,मका आदी ०८ हजार ११५.१५ क्विंटल भुसार माल खरेदी करून त्याची होणारी रक्कम ३९ लाख ४५ हजार ४४२ रुपये देण्यास नाकबूल गेल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने कोपरगावसह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी सुनील कोठारी यांचा सोयाबीन,मका,ज्वारी खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे.ते तालुक्यातील शेतकऱ्याकडून विविध पीक हंगामांत भरलेला भुसार माल ते अन्यत्र असलेल्या व्यापाऱ्यांना विकत असतात.असाच माल त्यांनी नगर येथील व्यापारी विनय माचवे व मे.रविकिरण नावाचे पोल्ट्री धारक यांना सन-२०१५ ते सन २०१९ विश्वास संपादन करून या दरम्यान विकला होता.त्याचे वजन एकूण ०८ हजार ११५.१५ क्विंटल होते.त्या बाबत त्यांनी रीतसर कागदोपत्री व्यवहार केला होता.व त्या बदल्यात त्यांचेकडून फिर्यादी व्यापारी कोठारी यांना ३९ लाख ४५ हजार ४४२ रुपये येणे होते.मात्र आरोपीने अंगठा दाखविल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी व्यापारी सुनील कोठारी हे कोपरगाव येथील प्रसिद्ध भुसार मालाचे व्यापारी असून त्यांचे इंदिरा पथ येथील आढाव हॉस्पिटलच्या मागे सुशीलकुमार कोठारी यांच्या इमारतीत गाळा क्रं.२८ असून त्यातून ते आपला व्यवसाय करत असतात.त्यांचा सोयाबीन,मका,ज्वारी खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय आहे.ते तालुक्यातील शेतकऱ्याकडून विविध पीक हंगामांत भरलेला भुसार माल ते अन्यत्र असलेल्या व्यापाऱ्यांना विकत असतात.असाच माल त्यांनी नगर येथील व्यापारी विनय माचवे व मे. रविकिरण नावाचे पोल्ट्री धारक यांना सन-२०१५ ते सन २०१९ विश्वास संपादन करून या दरम्यान विकला होता.त्याचे वजन एकूण ०८ हजार ११५.१५ क्विंटल होते.त्या बाबत त्यांनी रीतसर कागदोपत्री व्यवहार केला होता.व त्या बदल्यात त्यांचेकडून फिर्यादी व्यापारी कोठारी यांना ३९ लाख ४५ हजार ४४२ रुपये येणे होते.याबाबत कोठारी यांनी वारंवार तगादा करूनही आरोपी विनय माचवे व रविकिरण पोल्ट्रीधारक यांनीं दुर्लक्ष केले होते.व सम्बधित आरोपी हे उडवाउडवीची उत्तरे देत होते.त्यांना समजावून सांगूनही त्यांनी याबाबत कानाडोळा केला होता.त्यांना समजावून सांगूनही उपयोग न झाल्याने अखेर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी विनय माचवे व मे. रविकिरण पोल्ट्रीचे मालक नाव माहिती नाही यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान प्रमुख आरोपी विनय माचवे यास कोपरगाव शहर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

घटनास्थळी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी भेट दिली असून घटनेचे गांभीर्य समजावून घेतले आहे.व कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा.र.क्रं.३३९/२०२१ भा.द.वि.कलम ४२०,४०९ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दाते हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close