कामगार जगत
ग्रामसेवकांना साखर वाटप समारंभ संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ग्रामसेवक संघटनेच्या वतीने ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांच्या उपस्थितीत कोपरगाव तालुक्यातील सर्व सभासदांना कोपरगाव पंचायत समिती प्रांगणात नुकताच साखर वाटप कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पार पडला आहे.
पतसंस्था सभासदांच्या हितासाठी नेहमी कार्यरत असून भविष्यात सुद्धा सभासद हितासत्व अनेक चांगले निर्णय घेतले जातील-एकनाथराव ढाकणे, राज्याध्यक्ष ग्रामसेवक संघटना.
ग्रामसेवक संघटना राज्यातील ग्रामसेवकांच्या हितासाठी स्थापन करण्यात आली आहे.या संघटनेच्या माध्यमातून ग्रामसेवकांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.दीपावली या सणाचे औचित्य साधून सभासदांना साखर वाटप करण्याचा कार्यक्रम राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष गोरक्षनाथ शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयोजित केला होता.
या प्रसंगी पतसंस्थेचे संचालक रमेश पाटील बांगर,जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे मानद अध्यक्ष कडू पाटील, कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष गोरक्षनाथ शेळके,तालुका सचिव नारायण खेडकर,जिल्हा उपाध्यक्ष ग्रामसेवक संघटना अहमद शेख,जिल्हा उपाध्यक्ष ग्रामसेवक संघटना टेमक मॅडम, मानद अध्यक्ष कोपरगाव तालुका ग्रामसेवक संघटना गुंड पाटील, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष दिगंबर बनकर,तालुका सचिव जालिंदर पाडेकर आणि सर्व सभासद बहु संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे यांनी मार्गदर्शन करताना संघटनेच्या कामाचे कौतुक केले व पतसंस्था सभासदांच्या हितासाठी नेहमी कार्यरत असून भविष्यात सुद्धा सभासद हितासत्व अनेक चांगले निर्णय घेतले जातील असे आश्वासन दिले व दिपावलीच्या सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्तविक ग्रामसेवक अहमद शेख यांनी केले. तर उपस्थितांचे आभार ग्रामसेवक संघटनेचे सचिव जालिंदर पाडेकर यांनी केले आहे.