कृषी विभाग
जमीन आरोग्य पत्रिका नुसार खत व्यवस्थापन करा-आवाहन

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जमिनीचे मृद आरोग्य सुधारण्यासाठी तसेच मूलद्रव्यांची परिणामकारकता वाढविण्यासाठी जैविक खते,सेंद्रिय खते,गांडूळ खत,निंबोळी,सल्फर आच्छादित युरियासारख्या संथ गतीने नत्र पुरवठा करणाऱ्या खतांच्या वापरास प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी नुकतेच कुंभारी येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
केंद्र शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दर तीन वर्षांनंतर त्याच्या शेताची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन घ्यावयाची आहे-अशोक आढाव,तालुका कृषी अधिकारी.
सधन कृषि पद्धतीत रासायनिक खतांच्या अनिर्बंधित वापरामुळे व अन्य कारणांमुळे या भूमातेचे आरोग्य बिघडत चालले आहे.त्याचा पीक उत्पादनावर विपरित परिणाम होऊ लागला आहे.भूमातेचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी मृद तपासणीवर आधारित खतांच्या संतुलित तसेच परिणामकारक वापरास अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.त्यासाठी केंद्र शासनाने मृद आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या अभियानाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला दर तीन वर्षांनंतर त्याच्या शेताची मृद आरोग्य पत्रिका उपलब्ध करुन घ्यावयाची आहे. राज्यात या कालबद्ध महत्त्वाकांक्षी अभियानाची अंमलबजावणी अत्यंत परिणामकारकपणे सुरु आहे.या कार्यक्रमांतरंर्गत ते कोपरगाव तालुक्यातील कुंभारी शिवाजीनगर येथे बोलत होते.
या वेळी तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,मंडल कृषी अधिकारी कोळपेवाडी अविनाश चंदन,चंद्रकांत डरांगे,आत्माचे शैलेश आहेर,कृषी सहाय्यक निलेश बिबवे,कंपनीचे एच.डी. प्रभाकर सुंदरराव कदम,दिपकराव ठाणगे,मंगेश बढे,अण्णासाहेब बढे,मच्छिंद्र कदम,प्रभाकर कदम,उपसरपंच दिगंबरराव बढे सरपंच प्रशांत घुले आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना म्हणाले की,”जमीन आरोग्य पत्रिकेचे महत्त्व तसेच माती परीक्षणाच्या माध्यमातून आपल्याला संतुलित खताचा वापर करणे शक्य होते तसेच शेतकऱ्यांनी वेळेवर खत व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते त्याचबरोबर पिकाची निरीक्षणे आपण योग्य पद्धतीने घेतल्यास रोग व्यवस्थापन वरील खर्च कमी करता येतो तसेच यावेळी तयार झालेले सोयाबीनचे उत्पादनातुन पुढील वर्षासाठी बियाणी ठेवावे व कांदा उत्पादन तंत्रज्ञान मधील विविध बाबींमध्ये विश्लेषण करताना खत व्यवस्थापन सविस्तरपणे शेतकऱ्यांना माहिती दिली.
या प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना बिजप्रक्रियेचे महत्त्व मंडळ अधिकारी चंदन अविनाश यांनी समजावून सांगितले आहे.तर कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करून सुरक्षित अंतर राखून कार्यक्रम घेण्यात आला आहे.सदर प्रशिक्षणास शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.