जाहिरात-9423439946
कृषी विभाग

उत्पादन वाढीसाठी बीजप्रक्रिया महत्वाची-आवाहन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शेतकऱ्यांनी रब्बी पिकांच्या गहू,हरभरा किंवा तत्सम पिकांची लागवड करताना जिवाणूंची बीजप्रक्रिया करणे जमिनीच्या आरोग्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी फार आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोपरगाव तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी नुकतेच देर्डे चांदवड येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

शेतकऱ्यांनी गहू,हरभरा किंवा इतर पिकांची लागवड करताना जिवाणूंची बीजप्रक्रिया करणे जमिनीच्या आरोग्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी फार आवश्यक आहे.जिवाणूंच्या वापराने रासायनिक खतांच्या वापरात बचत तर होतेच पण त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य देखील सुधारते,बियाण्याची उगवण क्षमता वाढते,पिकामध्ये ताण सहन करण्याची क्षमता वाढते.पर्यायाने उत्पादन वाढीसाठी मदत होते-अशोक आढाव,तालुका कृषी अधिकारी,कोपरगाव.

कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे येथे माती परिक्षणावर आधारित जमिनींची आरोग्य पत्रिका या विषयावर शेतकऱ्यांत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत हॊते.

या कार्यक्रमासाठी गावडे मॅडम, मंडळ कृषी अधिकारी पोहेगाव,देर्डे- कोऱ्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच योगीराज देशमुख,माऊली ऍग्रोचे भाऊसाहेब डुबे,कृषी पर्यवेक्षक श्री भोसले.श्री घनकुटे,कृषी सहाय्यक श्री पावरा,कृषिमित्र त्रिंबक शिंदे,श्री गवळी सर, व परिसरातील शेतकरी सुहास शिंदे,मार्तंड शिंदे,सुदाम शिंदे,शंतनु शिंदे,विलास डुबे,तानाजी कोल्हे,ज्ञानेश्वर देशमुख,राजेंद्र गवळी,राधाकृष्ण डुबे,कृष्णा शिलेदार,अनिल शिंदे,ज्ञानदेव शिंदे,बाळासाहेब कोल्हे,मच्छिंद्र शिंदे,आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक शैलेश आहेर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतकऱ्यांनी गहू,हरभरा किंवा इतर पिकांची लागवड करताना जिवाणूंची बीजप्रक्रिया करणे जमिनीच्या आरोग्यासाठी आणि उत्पादन वाढीसाठी फार आवश्यक आहे.जिवाणूंच्या वापराने रासायनिक खतांच्या वापरात बचत तर होतेच पण त्याचबरोबर जमिनीचे आरोग्य देखील सुधारते,बियाण्याची उगवण क्षमता वाढते,पिकामध्ये ताण सहन करण्याची क्षमता वाढते.पर्यायाने उत्पादन वाढीसाठी मदत होते.

याप्रसंगी अथर्व ऍग्रो ऑरगॅनिक,नाशिकचे प्रशांत आढाव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना अथर्व बीजप्रक्रिया किटचे महत्त्व सांगून अथर्व बीजप्रक्रिया किटचे प्रात्यक्षिक करून दाखविले.तसेच कृषी सहाय्यक निलेश बिबवे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मातीचा नमुना कसा घ्यायचा हे सविस्तर सांगितले आहे आत्माचे शैलेश आहेर यांनी पिकेल ते विकेल या विषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक मंडळ कृषी अधिकारी गावडे मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत देर्डे- कोऱ्हाळे ग्रामपंचायतीचे सरपंच योगीराज देशमुख,यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार श्री पावरा यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close