गुन्हे विषयक
मालवाहतूक वाहन विहिरीत पडले,एक ठार,कोपरगावनजीक दुर्घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीत काल दुपारी ०४ वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्ग लगत सेवा रस्त्याने जाणारी मालवाहतूक पिकअप (क्रं.एम.एच.१७ ए.जी.५८३६) या गाडी नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्याकडेला असलेल्या विहिरीत पडून मोठा अपघात होऊन त्यात जगन सिमा पाडवी (वय-२०) हा सरदानगर ता.तळोदा जि.नंदुरबार येथील तरुण ठार झाला असल्याची झाल्याची फिर्याद त्याचा भाऊ कालू सीमा पडवी (वय-२८) ह.मु.जवळके याने आरोपी महेंद्र रमेश गवळी रा.मढी खुर्द याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दखल केली आहे.यातील चालकाने उडी टाकल्याने त्याचा जीव वाचवण्यास यश आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या सेवा रस्त्याने जाणारी वरील क्रमांकाची महावितरण कंपनीच्या उपठेकेदारांची महिंद्रा पिकअप गाडी आपल्या कामानिमित्त जात असताना त्यास रस्त्याचा अंदाज आला नाही.ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला जोगेश्वरी इंग्लिश स्कुलचे मागे समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या विहिरीत पडून भिषण अपघात झाला आहे. त्यात एकजण ठार झाला आहे.मात्र सुदैवाने चालक बचावला आहे.
या बाबद सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून तालुक्यातील डाऊच खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गाच्या बाजूला असलेल्या सेवा रस्त्याने जाणारी वरील क्रमांकाची महावितरण कंपनीच्या उपठेकेदारांची महिंद्रा पिकअप गाडी आपल्या कामानिमित्त जात असताना त्यास रस्त्याचा अंदाज आला नाही.ब्रेक नादुरुस्त झाल्यामुळे रस्त्याच्या कडेला जोगेश्वरी इंग्लिश स्कुलचे मागे समृद्धी महामार्गाच्या लगत असलेल्या विहिरीत पडून भिषण अपघात झाला आहे.चालकाच्या लक्षात आल्यावर त्याने वाहनातून उडी मारली मात्र त्याचा मदतनीस गाडी होता.यात मदतणीस जगन पाडवी याचा जागीच मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गाचे आपत्कालीन पथक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल,अग्निशामक दल,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना पाचारण करून गाडी विहिरीतुन काढण्याचे प्रयत्न सुरु केले होते त्यांना सदर गाडी काढण्यास रात्री १० वाजेच्या दरम्यान यश आले होते.
सदर दुर्घटनेची व घटनास्थळाची माहिती मिळताच तेथील माजी सरपंच संजय गुरसळ,पोलिस पाटील बाळासाहेब गायकवाड,शिवसुत्र युवा प्रतिष्ठाणचे संस्थापक सुधाकर वक्ते,भास्कर होन,सुनील होन,सागर होन,प्रा.मधुकर वक्ते,विक्रम वक्ते,राजेंद्र वक्ते, सोमनाथ होन,पंकज पुंगळ,समुद्धीचे अधिकारी,पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली होती.व मदत कार्य सुरु केले होते.त्यांनी तात्काळ समृद्धी महामार्गाचे आपत्कालीन पथक,महाराष्ट्र राज्य सुरक्षा दल,अग्निशामक दल,कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी,कर्मचारी,आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना पाचारण करून गाडी विहिरीतुन काढण्याचे प्रयत्न सुरु केले होते त्यांना सदर गाडी काढण्यास रात्री १० वाजेच्या दरम्यान यश आले होते.मयत इसमास काढून त्याचे उत्तरीय तपासणीसाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले होते.त्यास येथील उपचार करणारे वैद्यकीय अधिकऱ्यानी मृत घोषित केले आहे.
सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच मोठी खळबळ उडाली असून याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठण्यात या प्रकरणी गुन्हा क्रं.१६८/२०२३ भा.द.वि.कलम ३०४,(अ) ४२७ २७९ मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.के.ए.जाधव हे करीत आहेत.