जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

नैसर्गिक आहारासह निसर्गोपचाराने आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवा-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नैसर्गिक स्रोत हे जीवनसत्त्वे,खनिजे,सूक्ष्म पोषक आणि अँटिऑक्सिडंट्सचे चांगले स्रोत आहेत हे आपले एकूण आरोग्य सुधारण्यास खूप मदत करत असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील आहार तज्ञ डॉ.वर्षा झंवर यांनी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आपलं जीवन हे निसर्गाची देणगी आहे आणि त्याला निसर्गयुक्त पदार्थांनी समृद्ध करणं हे गरजेचं आहे.आज १०० टक्के शुद्ध अन्न मिळवणं अवघड नक्कीच आहे; पण कुठंतरी सुरुवात करूयात आणि आपलं खाणं जास्तीतजास्त शुद्ध आणि नैसर्गिक कसं करता येईल,त्यासाठी जागरूक राहणे गरजेचे आहे”-डॉ.वर्षा झंवर,आहार तज्ज्ञ,कोपरगाव.

कोपरगाव शहरात तिथीनुसार शिवजयंती निमित्त योग प्रचार प्रसार संस्थेच्या वतीने महिलांच्या आरोग्यासाठी नैसर्गिक आहार व निसर्गोपचार या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माहेश्वरी समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा सरला राठी या होत्या.

सदर प्रसंगी शोभा दरक,प्रभा पांडे,हर्षदा पटवर्धन,सुनीता भुतडा,वंदना पांडे,सायली वाजे,जोती काटकर,रत्नाताई पवार,अलका भावसार,ऊर्मिला लोळगे,रेखा वर्मा,वंदना चिकटे,स्वाती मुळे,शोभा दरक,राधीका जाधव,सोनाली जाधव,मंदाकिनी बारे,जोस्ना धामणे,वर्षा वरखेडे,हर्षाली बागड,शिल्पा पुंडे,तनुजा मंजुळ,सुमित्रा कुलकर्णी,स्वाती अमृतकर,सारिका भावसार वैशाली अमृतकर,कमल नरोडे,सुनीता आवटी,गिरिषा कदम,वैशाली दिवेकर,शितल नाईक,सुनिता भावसार,रोहिणी पुंडे,स्मिता कुलकर्णी,मेघा कुलकर्णी कोपरगाव शहरातील विविध स्तरातील,वेगवेगळ्या संघटनेतील अनेक महिला यावेळी उपस्थित होत्या.

त्यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की,” महिलांमध्ये केस,सौंदर्य,आरोग्य,रोगप्रतिकारशक्ती,मेंदू आदींशी संबंधित समस्या नैसर्गिक स्रोतांद्वारे सोडवल्या जातात.ऊठ सूठ अगदी किरकोळ आजारासाठी दवाखान्यात जाऊन औषधे खाने टाळायला हवीत.जीवनशैलीत,आहारात बदल आणून आपण आपले एकूण आरोग्य आणि फिटनेस सुधारू शकतो.आपल्या घरातील किचन हीच एक मोठी प्रयोगशाळा असल्याचे डॉ.झंवर या शेवटी म्हणाल्या आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्तविक संस्थेच्या योगशिक्षिका विमल पुंडे यांनी केले तर सूत्रसंचालन वंदना चिकटे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे कविता शहा यांनी आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close