दळणवळण
कोपरगाव बस आगारात,विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आपले बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले असून आज सकाळी ०७ वाजेपासून कोपरगाव बस आगराच्या प्रवेश द्वारावर हे उपोषण संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आल्याने आज ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
“या आंदोलनात कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा,वार्षिक वेतनवाढ ही दोन टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी,घरभाडे भत्ता ०८,१६,२४ % प्रमाणे देण्यात यावे,दिवाळीपूर्वी वेतन मिळावे.सन अग्रीम १२ हजार ५०० ०तर सरसकट १५ हजार दिवाळी भेट देण्यात यावी आदी पमुख मागण्या केल्या आहेत”-संजीव गाडे,सचिव,एस.टी.कामगार संघटना.
राज्यभरातील एस.टी. कर्मचाऱ्यांनी आज पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.कर्मचा-यांचे आंदोलन तीव्र झालं तर दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.दिवाळी तोंडावर असताना एसटी कर्मचा-यांच्या मात्र तोंडचा घास पळाला आहे निराशेनं आणि आर्थिक विवंचनेनं आतापर्यंत २६ एसटी कर्मचा-यांनी आत्महत्या केली आहे.त्यामुळे राज्य परिवहन मंडळातील कर्मचारी संतप्त झाले आहे.या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आज सकाळपासून सुरू झाले आहे.
प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून राज्यभरात उपोषणास बसले आहेत मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.त्यामुळे कोपरगाव शिर्डी या बस स्थानकातून आज येथे एस.टी.सकाळपासून बाहेर गेलेली नाही.जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावर एसटी कर्मचारी ठाम आहेत.त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
काय आहेत एस टी कर्मचा-यांच्या मागण्या
दरम्यान या आंदोलनात कर्मचाऱ्यांना २८ टक्के महागाई भत्ता देण्यात यावा,वार्षिक वेतनवाढ ही दोन टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी,घरभाडे भत्ता ०८,१६,२४ % प्रमाणे देण्यात यावे,दिवाळीपूर्वी वेतन मिळावे.सन अग्रीम १२ हजार ५०० ०तर सरसकट १५ हजार दिवाळी भेट देण्यात यावी आदी पमुख मागण्या केल्या आहेत.
दरम्यान आज सकाळपासून आयोजित आंदोलनाबाबत एस.टी.कामगार अध्यक्ष नवनाथ बढे,कामगार सेना अध्यक्ष भरत मोरे,एस.टी.कामगार संघटना सचिव संजीव गाडे,एस.टी.कामगार सेना सचिव अनिल भाबड,आदींनी कोपरगाव तहसीलदार विजय बोरुडे,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,आगार प्रमुख अभिजित चौधरी यांना आपल्या मागण्याचे निदेडन दिले असून त्यात म्हटलं आहे की,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करा.राज्य परिवहन महामंडळ हा महाराष्ट्रातील अस्मिता आणि मराठी बाणा जपणाऱ्या मराठी जनतेच्या अत्यावश्यक सेवेतील एक घटक आहे,जो खेड्यापासून महानगरांपर्यंत अस्तित्वात आहे.प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेले एसटी महामंडळ अपेक्षांची नोंद घेऊन महामंडळाची सेवा प्रवासाभिमुख आणि समाजाभिमुख हेतू साध्य करत आहे,महामंडळाला तोटा होत असल्यानं महामंडळ प्रवाशांची उत्तम प्रकारे सेवा करण्यास अपुरं पडत असल्याचं दिसून येत आहे.एस.टी. महामंडळाला अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्य शासनात विलिन केल्यास महाराष्ट्र शासन अधिक सक्षम होण्यास मदत होईल,असं पत्रात म्हटलं आहे.सदर प्रसंगी एस.टी.कामगार सेना राज्य उपाध्यक्ष किरण बिडवे,सचिन घुमरे,सुमित बिडवे,प्रवीण अहिरे,रावसाहेब थोरात आदींसह बहुसंख्य चालक,वाहक,प्रशासकीय कर्मचारी व कार्यशाळा कर्मचारी आदींसह बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित आहे.