गुन्हे विषयक
शटरचे कुलूप तोडून चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका शिवारात ‘हॉटेल द्वारकामाई’ येथे अज्ञात चोरट्यांनी शटरचे कुलूप तोडून आतील दूरदर्शन संच,एक मिक्सर ग्राइंडर,एक इंन्व्हर्टर बॅटरी असा सुमारे २० हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला असून त्याबाबत फिर्यादी भूषण राधाकिसन वलटे यांनी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे दहिगाव बोलका व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई-नागपूर या जुन्या महामार्गावर दहिगाव बोलका येथे’हॉटेल द्वारकामाई’ नावाचे हॉटेल असून त्या समोर व्यवसायासाठी त्यांनी काही गाळे निर्माण केले आहे.त्या गाळ्यावर काही चोरट्यांची वक्र दृष्टी होती.त्यांनी त्यावर पाळत ठेऊन दि.२ ऑक्टोबरच्या रात्री १०.३० वाजे नंतर व पहाटे ३ वाजेच्या आत या दरम्यान कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत त्या ठिकाणच्या गाळ्यांचे कुलूप तोडून त्या गळ्यातील एक ‘सॅमसंग’ कंपनीचा दुरदर्शन संच,५ हजार रुपये किमतीचा पॉवर ग्राइंडर,५ हजार रुपये किमतीची ९५ वॅटची बॅटरी असा एकूण २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
कोपरगाव तालुक्यात गत महिन्यात संवत्सर शिवारात दरोडा पडल्यानंतर चोरीचे सत्र थांबायचे नाव घेताना दिसत नाही.एका पाठोपाठ चोऱ्या सुरु असून चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले असल्याचे दिसून येत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील दहिगाव बोलका शिवारात घडली आहे.तेथील हॉटेल चालक भूषण वलटे यांचे मुंबई-नागपूर या जुन्या महामार्गावर ‘हॉटेल द्वारकामाई’ नावाचे हॉटेल असून त्या समोर व्यवसायासाठी त्यांनी काही गाळे निर्माण केले आहे.त्या गाळ्यावर काही चोरट्यांची वक्र दृष्टी होती.त्यांनी त्यावर पाळत ठेऊन दि.२ ऑक्टोबरच्या रात्री १०.३० वाजे नंतर व पहाटे ३ वाजेच्या आत या दरम्यान कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत त्या ठिकाणच्या गाळ्यांचे कुलूप तोडून त्या गळ्यातील एक ‘सॅमसंग’ कंपनीचा सुमारे १० हजार रूपये किमतीचा ४२ इंची दुरदर्शन संच,५ हजार रुपये किमतीचा ‘गोपी’ कंपनीचा दोन अश्वशक्तीचा पॉवर ग्राइंडर,५ हजार रुपये किमतीचा एक ‘व्ही गार्ड’ कंपनीची ९५ वॅटची बॅटरी असा एकूण २० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.फिर्यादी वलटे यांच्या हि बाब पहाटे तीन नंतर लक्षात आली तो अपर्यंत उशीर झाला होता.त्यांनी तात्काळ सकाळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव,पोलीस हे.कॉ.आर.एम.म्हस्के यांनी भेट दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३८४/२०२२ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्ग दर्शनाखाली पोलीस हे.कॉ.म्हस्के हे करत आहेत.