कोपरगाव तालुका
शिव कथाकार डॉ. प्रविण महाराज दुशिंग यांचा कोकमठाण येथे शिव गाथा कार्यक्रम
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील प. पू. ब्रम्हलीन रामदासी महाराज यांच्या ३० व्या पुण्यतिथी
सोहळ्यानिमित्त कोकमठाण येथे शनिवार दि. ११ ते शनिवार दि. १८ जानेवारी या
सप्ताह कालावधीत शिव चरित्र कथेचे गाढे अभ्यासक ह. भ. प. डॉ. प्रविण महाराज दुशिंग
यांचा गाथा शिव शौर्याची हा कार्यक्रम पार पडणार आहे.
प. पू. रामदासी महाराज हे गोदावरीच्या काठावरील कोकमठाण – संवत्सर पंचक्रोशीतील
भाविकांचे श्रध्दास्थान असून त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या
उत्साहात पार पडत असतात. अखंड हरिनाम सप्ताह, भजन, कि्तन, काकडा, महाप्रसाद अशा
विविध कार्यक्रमांनी कोकमठाणचा परिसर भक्तीमय होऊन जातो. यावर्षी ह. भ. प. डॉ. प्रविण
महाराज दुशिंग यांचे झी टॉकीजवर विविध कार्यक्रम झालेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आठ
दिवस पुण्यतिथी सोहळा पार पडणार असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची व शौर्याची
गाथा ते स्वत: शिव चरित्र कथेमधून सांगणार आहेत. भव्य दिव्य जिवंत देखाव्यासह ही कथा रोज
रात्री ८ ते ११ या वेळेत भाविकांना ऐकायला मिळणार आहे.
शनिवार दि. १८ जानेवारी रोजी सोहळ्याची सांगता होणार असून सकाळी १० वाजता
महंत रामगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा
कार्यक्रम होणार आहे. भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकमठाण
ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.