कोपरगाव तालुका
प्रा. देविदास रणधीर यांना पुणे विद्यापीठाची पीएच. डी.
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागीर महाराज महाविद्यालयातील मधील भूगोल विभागातील प्रा. देविदास सखाराम रणधीर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच. डी. पदवी नुकतीच प्राप्त झाली असून त्यांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रा.रणधीर यांनी “डेव्ह्लोपिंग स्ट्रॅटजीज फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट इन बॉक्साईट मायनिंग एरियाज ऑफ वेस्टर्न महाराष्ट्र” या विषयावर संशोधन केले आहे. त्यांना प्राध्यापक डॉ.अमित धोर्डे यांचे मार्गदर्शन लाभले होते. डॉ. देविदास रणधीर यांच्या या संशोधनाचा लाभ पर्यावरण अभ्यासक, भूगोल प्रेमी नविन संशोधकांना, परिसरातील विद्यार्थ्यांना होणार असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.आर. थोपटे यांनी व्यक्त केले. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास् समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संस्थेचे उपाध्यक्ष व माजी मंत्री शंकरराव कोल्हे, कर्मवीर शंकररावजी काळे स.सा.कारखान्याचे जेष्ठ संचालक अशोक काळे, सहकार महर्षी कोल्हे स.सा.का. सहजानंदनगरचे अध्यक्ष बिपिन कोल्हे,आ. आशुतोष काळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य दिलीप दारूणकर, संदीप वर्पे, सुनिल गंगुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर.थोपटे, उपप्राचार्य प्रा.आर.एस.झरेकर, डॉ.आर.जी.पवार, डॉ. विजय निकम, डी.डी.सोनवणे, भूगोल विभाग प्रमुख डॉ.सी.बी. चौधरी, डॉ.सुभाष रणधीर, प्रा.वसंत गायकवाड, डॉ.राजाराम कानडे, डॉ.संजय सांगळे, डॉ.गणेश विधाटे, डॉ.बाबासाहेब शेंडगे, डॉ. कैलास महाले, डॉ.निलेश मालपुरे, प्रा.राजेंद्र लवांडे डॉ.माधव यशवंत,डॉ.योगेश दाणे, अधीक्षक वसंतराव पवार यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी प्रा. देविदास सखाराम रणधीर यांचे अभिनंदन केले आहे.