जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दोन दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात,कोपरगावातील घटना

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याने लक्षवेधी कामगिरी करत यात दुचाकी चोरणाऱ्या टोळीकडून तब्बल ८ लाख ६५ हजार रुपयांचा १३ दुचाकीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याचेही माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांना नुकतीच एक गोपनीय खबर मिळाली होती.त्यात दोन इसम कोपरगाव नजीक ईशान्येस शिंगणापूरनजीक असललेल्या औद्योगिक वसाहत कोपरगाव येथे चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलीस निरीक्षक यांनी आपले पोलीस कर्मचारी यांना घेऊन सदर ठिकाणी सापळा लावला होता.त्यात दोन आरोपींवर कारवाई करत त्यांना यश मिळाले आहे.

कोपरगाव तालुक्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला असून यात अनेक कोऱ्या गाड्या पळवून नेत आहेत.त्यामुळे शहरातील दुचाकीस्वारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतांना कोपरगाव शहर पोलिसांना नुकतीच एक गोपनीय खबर मिळाली होती.त्यात दोन इसम कोपरगाव नजीक ईशान्येस शिंगणापूरनजीक असललेल्या औद्योगिक वसाहत कोपरगाव येथे चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी येणार आहे. यावर पोलीस निरीक्षक यांनी आपले पोलीस कर्मचारी यांना घेऊन सदर ठिकाणी सापळा लावला होता.त्यात कारवाई करत त्यांना यश मिळाले आहे.रात्रीच्या सुमारास औद्योगिक वसाहत संवत्सर शिवारातून दोन ईसमांस ताब्यात घेतले होते.यामध्ये किशोर साहेबराव कापसे (वय-२१ वर्ष) व सचिन अंबादास कापसे (वय- २०) रा.तागडी नांदगाव,जिल्हा-नाशिक यांच्याकडून सुमारे तब्बल तेरा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.हस्तगत केलेल्या दुचाकीत हिरो-होंडा,बजाज,बुलेट आदी कंपनीच्या गाड्यांचा यामध्ये समावेश आहे

या कामगिरी बद्दल पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर श्रीमती स्वाती भोर,शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांनी पोलीस निरीक्षक निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांचे या कामगिरीबद्दल अभिनंदन केले आहे.
तसेच या गुन्ह्यामध्ये पोलिसांना तीन आरोपी अटक करण्यात यश आले असून पुढील तपास वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close