गुन्हे विषयक
एकाची गळफास घेऊन आत्महत्या,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला इसम दिलीप दिनकर निकम (वय-५०) यांनी अज्ञात कारणाने आपल्या राहत्या घरासमोर आज सकाळी ०६ वाजेपुर्वी कांद्याच्या चाळीत लोखंडी छतास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली आहे.या प्रकरणी मयताचा भाऊ मोतीराम निकम (वय-३५) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
मयत इसम याचे घरात जमिनीच्या कारणावरून अनेक वर्षांपासून अंतर्गत वाद होते.त्यामुळे शेती पडीक होती.त्यामुळे उत्पन्न मिळण्यात मोठी अडचण होती.त्यामुळे सदर इसम निराश होता.त्यातच मुला-मुलीचे विवाह जमविण्यात अडचणी येत होत्या.त्यामुळे सदर इसम तणावात असल्याची माहिती मिळत आहे.सदर इसम वडीलापासून विभक्त राहत होता.उत्पन्न साधन नसल्याने कायम तणावात राहत होता.त्यातून हि घटना घडल्याचे बोलले जात आहे.
मयत इसम याचे घरात जमिनीच्या कारणावरून अनेक वर्षांपासून अंतर्गत वाद होते.त्यामुळे शेती पडीक होती.त्यामुळे उत्पन्न मिळण्यात मोठी अडचण होती.त्यामुळे सदर इसम निराश होता.त्यातच मुला-मुलीचे विवाह जमविण्यात अडचणी येत होत्या.त्यामुळे सदर इसम तणावात असल्याची माहिती मिळत आहे.सदर इसम वडीलापासून विभक्त राहत होता.उत्पन्न साधन नसल्याने कायम तणावात राहत होता.त्यातून हि घटना घडल्याचे बोलले जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,तीन मुली असा परिवार आहे.त्यातून हि दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यु नोंद क्रं.५०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.टी.चव्हाण हे करीत आहेत.