गुन्हे विषयक
सेंट्रिंग साहित्याची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर शिवारात नारंदी नदीवर बांधकाम सुरु असताना त्यासाठी त्या ठिकाणी संबधित इसमाने आपले सेंन्ट्रीग साहित्य ठेवलेले होते. अज्ञात चोरट्याने कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत त्या ठिकाणच्या सुमारे ४० हजार रुपये किंमतीच्या २० लोखंडी प्लेटा पळवून नेल्या असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सोमनाथ झामा कुऱ्हाडे (वय-४०) रा.संजयनगर यांनी दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
संवत्सर शिवारात आपले पुलाचे बांधकाम सुरु असून त्या ठिकाणी त्यांनी आपले बांधकम साहित्य नेऊन ठेवले आहे.त्या ठिकाणी त्या साहित्यावर कोणा तरी अज्ञातच चोरट्यांचे लक्ष होते.त्यांनी सदर ठिकाणी कोणी नाही हि संधी साधत दि.०५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी ठेवलेल्या वरील वर्णनाचा सेंन्ट्रीग कामाच्या प्लेटा चोरून नेल्या आहेत.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादीचे संवत्सर शिवारात आपले पुलाचे बांधकाम सुरु असून त्या ठिकाणी त्यांनी आपले बांधकम साहित्य नेऊन ठेवले आहे.त्या ठिकाणी त्या साहित्यावर कोणा तरी अज्ञातच चोरट्यांचे लक्ष होते.त्यांनी सदर ठिकाणी कोणी नाही हि संधी साधत दि.०५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी ठेवलेल्या वरील वर्णनाचा सेंन्ट्रीग कामाच्या प्लेटा चोरून नेल्या आहेत.त्यांनी आजूबाजूस शोध घेऊन पहिले असता त्या मिळून आल्या नाहीत अखेर त्यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी अधिकाऱ्यासमवेत घटनास्थळी पोलीस भेट दिली आहे.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीसांनी आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२०६/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ कलमा प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.