गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यातील..’तो’ आरोपी चोवीस तासात जेरबंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर काम करत असलेला मात्र वर्तमान स्थितीत उभा असलेला १२ लाख रुपये किमतीचा अज्ञात चोरट्याने पळवलेला पिवळ्या रंगाचा रोलर कोपरगाव तालुका पोलीसांनी बेळगाव येथील आरोपी शिवानंद धर्माण्णा नाईक (वय-४२) याचेसह औरंगाबाद चिखलठाणा येथे जप्त केला आहे.त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
छायाचित्रात पोलीस अधिकाऱ्यांनी पकडलेला आरोपी व मुद्देमाल दिसत आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या गुन्ह्यात महत्वाचे दुवे हेरून आरोपीचा कयास लावला होता.व आपला तपास सुरू केला होता.त्या नुसार त्यांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली होती की सदरचा गुन्हा हा शिवानंद धर्मांणा याने केला आहे.त्यानुसार तालुका पोलिसांनी आरोपीवर पाळत ठेवली असता आरोपी हा औरंगाबाद चिखलठाणा येथे लपून बसला आहे.त्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.
वर्तमानात समृद्धी महामार्गावरील कंपनीकडून सरकारने काम अक्षम्य प्रलंबित केल्याने काढून घेतले आहे.त्यामुळे संबधित ठेकेदार हा आपली यंत्रणा काढून घेत आहे.व ती अन्यत्र विस्थापित करत आहे.त्यांचे कार्यालय चांदेकसारे शिवारात आहे.त्या ठिकाणी सदरचा विजयकुमार रेड्डी यांच्या मालकीचा रोड रोलर हा अज्ञात आरोपीने कोणाचे लक्ष नाही हि संधी साधत दि.२९ मे च्या सकाळी ०८ ते १०.३० वाजेच्या दरम्यान उभा असताना तो अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी पळवून नेला होता.या प्रकरणी फिर्यादी बापू जलापती रेड्डी यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.२२०/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ अन्वये दाखल केला होता.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी महत्वाचे दुवे हेरून आरोपीचा कयास लावला होता.व आपला तपास सुरू केला होता.त्या नुसार त्यांना गुप्त खबऱ्या मार्फत खबर मिळाली होती की सदरचा गुन्हा हा शिवानंद धर्मांणा याने केला आहे.त्यानुसार तालुका पोलिसांनी आरोपीवर पाळत ठेवली असता आरोपी हा औरंगाबाद चिखलठाणा येथे लपून बसला आहे.त्याला ताब्यात घेऊन त्याला पोलिसांनी आपला हिसका दाखवला असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.त्यानुसार तपासी अधिकाऱ्यांनी चोरी गेलेला सुमारे बारा लाख रुपयांचा रोड रोलर अवघ्या चोवीस तासात ताब्यात मिळवला आहे.त्याने कंपनी स्थलांतरित होत असल्याचा फायदा घेत व भंगार विक्री करत असल्याची संधी साधत हा डाव साधला होता.तो मालकाचे परस्पर विकला असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या तपासात शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पो.हे.कॉ.इरफान शेख,पो.कॉ.अनिस शेख,सायबर सेलचे पोलीस नाईक फुरखान शेख आदींनी महत्वाची भूमिका निभावली आहे.त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.