जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

विद्युत पंपाची चोरी करणारी टोळी पकडली,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालु क्यातील शेतकऱ्यांचे विद्युत पंपाची चोरी करणारी टोळी कार्यरत असून अनेकांचे विद्युत पंप चोरी होत असताना नुकतीच एक टोळी चोरी करताना रंगेहात पकडली असून देर्डे-कोऱ्हाळे येथील ग्रामस्थांनी त्यांना पकडून ठेवुन तालुका पोलिसांच्या हवाली केले आहे.या प्रकरणी आरोपी मच्छीन्द्र शरद शरद पवार या आरोपीला जेरबंद केले असले तरी अन्य तीन साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

देर्डे कोऱ्हाळे येथील फिर्यादी अनिल छबूराव देशमुख (वय-५४) यांची एक पाच अश्व शक्तीची विद्युत मोटार काही चोरटे चोरून नेत असल्याची खबर त्याना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यात तथ्य आढळून आले होते.त्यानुसार आरोपी मच्छीन्द्र पवार यास त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते.मात्र अन्य आरोपी राजू बर्डे रा.देर्डे-चांदवड,राजू भाऊसाहेब पवार,बबन सखाहारी पवार दोघे रा.देर्डे- कोऱ्हाळे हे मात्र घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात काही महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यात विद्युत पंप चोरी करणारी टोळी तालुका पोलिसांनी पकडली होती.त्यांच्यावर कारवाई झाली होती.तरीही देर्डे-कोऱ्हाळे आणि परिसरात या प्रकारच्या चोऱ्या मात्र थांबल्या नव्हत्या.त्या मुळे या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान तालुका पोलिसांपुढे निर्माण झाले होते.

दरम्यान दि.१४ जून रोजी रात्री ०९ वाजेच्या सुमारास शेत गट क्रं.६२/५ मध्ये हिंगणी शिवारात देर्डे कोऱ्हाळे येथील फिर्यादी अनिल छबूराव देशमुख (वय-५४) यांची एक पाच अश्व शक्तीची विद्युत मोटार काही चोरटे चोरून नेत असल्याची खबर त्याना मिळाली होती.त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यात तथ्य आढळून आले होते.त्यानुसार आरोपी मच्छीन्द्र पवार यास त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रंगेहात पकडले होते.मात्र अन्य आरोपी राजू बर्डे रा.देर्डे-चांदवड,राजू भाऊसाहेब पवार,बबन सखाहारी पवार दोघे रा.देर्डे- कोऱ्हाळे हे मात्र घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.
या प्रकरणी फिर्यादी अनिल देशमुख यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी गंभीर दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२२१/२०२२ भा.द.वि.कलम ३७९,३४ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एल.ढाका हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close