गुन्हे विषयक
गॅसच्या नळीने मारहाण,कोपरगावात बारा आरोपींवर गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धामोरी ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला फिर्यादी आकाश विजय जाधव (वय-२२) यास राहुल दत्तात्रय पवार,चासनळी यांचेसह दहाबारा आरोपिंनी मोटारसायकल अंगावर का घातली याचा जाब विचारल्याचा राग येऊन काल रात्री आठ वाजेच्या सुमारास गॅसचे नळीने मारहाण करून गंभिर जखमी केले असल्याचा गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने धामोरी आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेत आरोपी राहुल दत्तात्रय पवार रा.चासनळी,महेंद्र नाजगड,मायगाव देवी,अमोल बाबासाहेब वाणी,बापू बाबासाहेब वाणी,बाबासाहेब वाणी,शरद वाणी,गणेश वाणी,सर्व रा.धामोरी आदींसह अनोळखी तीन ते चार आरोपी (नावे उपलब्ध नाही) यांनी फिर्यादिने,”आपल्या अंगावर मोटारसायकल का घातली ? याचा जाबसाल केल्याचा राग आला.त्यांनी त्यास गॅसच्या नळीने फिर्यादीचे वडील विजय भाऊसाहेब जाधव,भाऊ समीर विजय जाधव,चूलत भाऊ अक्षय राजेंद्र जाधव आदींना डोक्यावर,पाठीवर,हातावर व पायावर मारून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी तरुण हा धामोरी येथील रहिवासी असून काही आरोपी त्याच गावातील तर काही मायगाव देवी,आदी ठिकाणचे आरोपी आहे.गुरुवार दि.०९ जून रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास फिर्यादी तरुण हा गावात असताना आरोपीस म्हणाला की,”माझ्या अंगावर गाडी का घातली ? असा जाबसाल केला या किरकोळ कारणावरून दि.०८ जून रोजी रात्री ०८ वाजेच्या सुमारास भांडण झाले आहे.
या घटनेत आरोपी राहुल दत्तात्रय पवार रा.चासनळी,महेंद्र नाजगड,मायगाव देवी,अमोल बाबासाहेब वाणी,बापू बाबासाहेब वाणी,बाबासाहेब वाणी,शरद वाणी,गणेश वाणी,सर्व रा.धामोरी आदींसह अनोळखी तीन ते चार आरोपी (नावे उपलब्ध नाही) यांनी फिर्यादिने,”आपल्या अंगावर मोटारसायकल का घातली ? याचा जाबसाल केल्याचा राग आला.त्यांनी त्यास गॅसच्या नळीने फिर्यादीचे वडील विजय भाऊसाहेब जाधव,भाऊ समीर विजय जाधव,चूलत भाऊ अक्षय राजेंद्र जाधव आदींना डोक्यावर,पाठीवर,हातावर व पायावर मारून मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान या घटनेत फिर्यादीचे मोबाईल व पैसे गहाळ झाले आहेत.मात्र ते कीती आहेत याचा फिर्यादीत उल्लेख आढळत नाही.या प्रकरणी आरोपी विरुद्ध फिर्यादी तरुण आकाश जाधव याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२१३/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६,४२७ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.बोटे हे करीत आहेत.