कोपरगाव तालुका
राज्यातील संतानी समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम केले-प्रबोधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे.संतानी समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम केले.संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानले होते.श्री संत जगनाडे महाराज जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते व चौदा टाळकऱ्यांपैकी एक विश्वासू टाळकरी होते. संत जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
एकदा तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते.त्यांची कीर्तने ऐकून संताजींवर तुकारामांचा मोठा प्रभाव पडला व त्यांनी संसार सोडण्याच्या निर्णय घेतला.तेव्हा तुकारामांनी संताजीना समजावून सांगितले की,” संसारात राहूनही परमार्थ साधता येतो.आणि तेव्हापासून संताजी जगनाडे महाराज (संतू तेली ) हे संत तुकारामाच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले.संत तुकारामांच्या सावलीत राहून त्यांनी तुकारामांचे अभंग उतरवून घेण्यास सुरुवात केली.त्यांची पुण्यतिथी कोपरगावात मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
कोपरगाव येथे संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त व्यापारी धर्मशाळेत आयोजित कार्यक्रम प्रसंगी श्री संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन केले या प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले,नगरसेवक मंदार पहाडे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,तेली समाज जिल्हा अध्यक्ष रमेश गवळी,फकीर कुरेशी,दिनकर खरे,डॉ.तुषार गलांडे,राहुल देवळालीकर,जावेद शेख,संदीप कपिले,धनंजय कहार,वाल्मिक लहिरे,मनोज नरोडे,राहुल राठोड,शिवाजी लकारे,आदीं मान्यवरांसह तेली समाज बांधव बहु संख्येने उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, तेली समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असून श्री संत जगनाडे महाराज मंदिराच्या सभामंडपासाठी १० लाख रुपये निधी दिला असून लवकरच या कामास प्रारंभ होणार आहे.भविष्यात देखील निधीची गरज भासल्यास निधी देवू असे आश्वासन दिले आहे.