गुन्हे विषयक
मंदिराची जागा मोजण्याच्या कारणावरून तुफान हाणामारी,कोपरगावात तेरा जणांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीत राहवासी असलेल्या फिर्यादिस लक्ष्मीमाता मंदिराची जागा मोजण्याच्या कारणावरून आरोपी निलेश सुनील सरोदे व जिजाबाई भिमराज ताते आदींसह तेरा जणांनी लाठी काठीने मारहाण केली असून,”तुम्ही माझ्या मावशीच्या नादीच्या लागला तर तुम्हाला गोळ्या घालून ठार मारून टाकील” अशी धमकी दिली असल्याही फिर्याद सुभाष सुभाष लांडगे (वय-४६) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
फिर्यादी व साक्षिदार हे घटनास्थळी गेले असता तेथे,’मंदिराची जागा मोजणी मोजण्याच्या कारणा’वरून यातील आरोपी निलेश सुनील सरोदे व जिजाबाई भिमराज ताते,भाऊसाहेब भीमराज ताते,दादाभाऊ भीमराज ताते,सोमनाथ रामदास पगारे,पोपट निवृत्ती ताते,सखुबाई पोपट ताते,ज्योती गोपीनाथ ताते, योगिता विजय ताते,विजय संजय ताते,गोपीनाथ देवराम ताते,नबाबाई लक्ष्मण ताते,आकाश भीमराज ताते आदी तेरा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षिदार याना शिवीगाळ व दमदाटी केली व गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी सुभाष लांडगे हे चांदेकसारे येथील रहिवासी असून ते दि.०८ जून रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास आपल्या घरात बसलेले असताना त्यांच्या घराचे पाठीमागे काही लोकांचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज ऐकू आला असता फिर्यादी व साक्षिदार हे पाठीमागे गेले असता तेथे,’मंदिराची जागा मोजणी मोजण्याच्या कारणा’वरून यातील आरोपी निलेश सुनील सरोदे व जिजाबाई भिमराज ताते,भाऊसाहेब भीमराज ताते,दादाभाऊ भीमराज ताते,सोमनाथ रामदास पगारे,पोपट निवृत्ती ताते,सखुबाई पोपट ताते,ज्योती गोपीनाथ ताते,योगिता विजय ताते,विजय संजय ताते,गोपीनाथ देवराम ताते,नबाबाई लक्ष्मण ताते,आकाश भीमराज ताते आदी तेरा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व साक्षिदार याना शिवीगाळ व दमदाटी केली आहे.दरम्यान सदर ठिकाणी साक्षिदार मीना बाळासाहेब लांडगे हि तेथे आली त्यावेळी तिला आकाश भीमराज ताते याने त्याच्या हातातील काठीने दोन्ही पायाच्या मांडीवर मारहाण केली व तसेच भाऊसाहेब ताते याने हातात दगड धरून तिचे पाठीवर मारला व जिजाबाई ताते हिने तिचे डोक्याचे केस धरून लाथा बुक्यांनी मारहाण केली आहे.
यातील आरोपी निलेश सुनील सरोदे याने फिर्यादी व साक्षिदार यांना म्हणाला की,”तुम्ही माझ्या मावशीच्या नादी लागला तर तर मी तुम्हाला गोळ्या घालून मारून टाकील” असे म्हणून दमदाटी केली व त्या सर्व आरोपींनीं शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादीने दाखल केली आहे.
दरम्यान या घटनेत साक्षिदार महिला मीना लांडगे (वय-३४) हि जखमी झाली आहे.घटनास्थळी शिर्डी उपविभागीय अधिकारी संजय सातव,पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव. पो.हे.कॉ.एस.डी.बोटे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२१०/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.डी.बोटे हे करीत आहेत.