जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या ग्रामपंचायतीने दिव्यांगांना केले साहित्य वाटप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील करंजी ग्रामपंचायतच्या वतीने गावातील दिव्यांग चोवीस लाभार्थ्यांना किराणा सामान ग्रामपंचायतच्या पाच टक्के निधीमधून नुकतेच देण्यात आले आहे.

समाजातील दृष्टीहीन, कर्णबधिर, अस्थिव्यंग, मनोविकलांग व कुष्ठरोगमुक्त अपंग व्यक्तींकडे त्यांच्या अपंगत्वाकडे न पाहता त्यांच्यामध्ये असलेल्या सामर्थ्यांकडे पाहून त्यांच्या मधील असलेले सुप्त सामर्थ्य विकसित करुन त्यांना समाज जीवनाच्या सर्व अंगामध्ये समान संधी,संपूर्ण सहभाग व त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय,तसेच इतर विविध विभागांमार्फत कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याचप्रमाणे सामाजिक सुरक्षिततेसाठी अपंगांना काही क्षेत्रामध्ये आरक्षण,सवलती,सूट व प्राधान्य देण्यात आलेले आहे.

याप्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सोनकुसळे,विस्ताराधिकारी सुनील माळी,दत्तात्रय रानमळ, सहकार महर्षी कोल्हे सहकारी कारखान्याचे संचालक भास्कर भिंगारे, काळे कारखान्याचे संचालक कारभारी आगवन,सरपंच छबुराव आहेर,उपसरपंच रवींद्र आगवन, ग्रामपंचायत सदस्य संजय आगवन,सोमनाथ फापाळे, शिवाजी करंजकर, बाळासाहेब भिंगारे, कोपरगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती नवनाथ आगवन,यांसह दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.सर्व लाभार्थींना सामाजिक अंतर ठेवून किराणा सामान वाटप करण्यात आले. तसेच सर्व गावकऱ्यांनी आजपर्यंत केलेल्या टाळेबंदीची अंमलबजावणी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल ग्रामस्थांचे आभार उपसरपंच रवींद्र आगवन यांनी आभार मानले. तसेच यापुढेही ग्रामस्थांनी असेस प्रशासनास सहकार्य करावे असे मान्यवर भास्करराव भिंगारे व कारभारी पाटील आगवन यांनी आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब गुंड यांनी प्रास्तविक केले तर कोपरगाव तालुका अध्यक्ष भाजपा दिव्यांग सेलचे मुकुंद काळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close