गुन्हे विषयक
महिलेचा विनयभंग,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी असलेली महिला (वय-४१) आरोपीस म्हणाली की,”तुम्ही आमचे पत्रे खोलून का नेता ? यांचा राग येऊन आरोपी अशोक शंकर लोणारी,संदीप अशोक लोणारी दोन्ही रा.ब्राम्हणगाव,त्र्यंबक काळु धोकरट रा.सोमठाणे ता.सिन्नर यांनी वाईट उद्देशाने आपला हात धरून साडी ओढून विनयभंग केला तर आरोपी पद्मा अशोक लोणारी व शुभांगी संदीप लोणारी यांनी आपल्याला दमदाटी करून लाथा बुक्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे ब्राम्हणगावसह परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिला हि घरासमोर असताना वरील आरोपी अशोक शंकर लोणारी,संदीप अशोक लोणारी दोन्ही रा.ब्राम्हणगाव,त्र्यंबक काळु धोकरट यांनी वाईट उद्देशाने आपला हात धरून साडी ओढून विनयभंग केला तर आरोपी पद्मा अशोक लोणारी व शुंभांगी संदीप लोणारी यांनी आपल्याला दमदाटी करून लाथा बुक्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला व आरोपी हे एकाच गावातील रहिवासी आहे.त्याचा किरकोळ कारणावरून वाद आहे.दि.३१ मे रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला हि घरासमोर असताना वरील आरोपी अशोक शंकर लोणारी,संदीप अशोक लोणारी दोन्ही रा.ब्राम्हणगाव,त्र्यंबक काळु धोकरट रा.सोमठाणे ता.सिन्नर यांनी वाईट उद्देशाने आपला हात धरून साडी ओढून विनयभंग केला तर आरोपी पद्मा अशोक लोणारी व शुंभांगी संदीप लोणारी यांनी आपल्याला दमदाटी करून लाथा बुक्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.घटनास्थळी सहाय्यक फौजदार ए.एम.आंधळे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१९७/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,३२३,५०४,५०६,१४३,१४७ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार आंधळे हे करीत आहेत.