जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात एका विरुद्ध विनयभंगासह ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील रहिवासी असलेली आदिवासी महिला वर्तमानात कुंभारी येथे रहिवासी असून ती आपल्या आईकडून मावशीकडे जात असताना रस्त्यात सोनवणे यांचे शेताजवळ उन्हाची तीव्रता टाळण्यासाठी झाडाच्या सावलीला थांबली असता त्याच गावातील आरोपी अरुण जालिंदर बढे हा तिच्या जवळ आला व त्याने तिला जातीवाचक शिवीगाळ करून तिचा जातीवाचक उल्लेख करून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली आहे.त्यामुळे तिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध ऍट्रॉसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कुंभारीसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला हि दि.०६ जून रोजी आपण सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास दवाखान्यातून घरी येत असताना पायी चालून थकले असता शेताचे कडेला लिंबाचे झाडाचे सावलीत आराम करणे साठी थांबले असता,सदर आरोपी हा आपल्या जवळ पुन्हा आला व आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून मला शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करून लागला व माझेशी शारीरिक लगट करत आपली साडी ओढून मला लाज वाटेल असे कृत्य त्याने केले आहे.आपण त्याचा हात झटकला व म्हणाले की,”तूला काही समजते का ? “मी,तुझ्यापेक्षा मोठी आहे.तेंव्हा तो जातीवाचक उल्लेख करून मी तुझ्याकडे पाहतो” असा दम देऊन निघून गेला.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिला हि मढी खुर्द येथील मूळ रहिवासी असून तीचे शिक्षण सातवी पर्यंत झालेले आहे.तिचे समवेत आई राहत असून ती मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालविते.ती दि.०५ जून रोजी आपल्या आईला भेटण्यासाठी कुंभारी येथे आली होती.तिचे घरापासून आरोपी अरुण बढे याचे घर साधारण एक कि.मी.अंतरावर आहे.आपण आदिवासी समाजाची आहे हे माहीती असताना त्याने सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास आपल्या आईकडून मावशीकडे जात असताना रस्त्यात आरोपी अरुण बढे याने दुचाकी आपल्या जवळ थांबवून आपल्याला म्हणाला की,”तू मला फार आवडते,तू माझे सोबत शाररिक संबंध ठेव” असे म्हटल्याने आपण त्याकडे रागाने पाहिले. त्या वेळी तो आपली दुचाकी सुरु करून निघून गेला.

दि.०६ जून रोजी आपण सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास दवाखान्यातून घरी येत असताना पायी चालून थकले असता शेताचे कडेला लिंबाचे झाडाचे सावलीत आराम करणे साठी थांबले असता,सदर आरोपी हा आपल्या जवळ पुन्हा आला व आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून मला शारीरिक संबंध ठेवण्याचा आग्रह करून लागला व माझेशी शारीरिक लगट करत आपली साडी ओढून मला लाज वाटेल असे कृत्य त्याने केले आहे.आपण त्याचा हात झटकला व म्हणाले की,”तूला काही समजते का ? “मी,तुझ्यापेक्षा मोठी आहे.तेंव्हा तो जातीवाचक उल्लेख करून मी तुझ्याकडे पाहतो” असा दम देऊन निघून गेला.त्याचा जाब विचारण्यासाठी आपली आई,दोन्ही भाचे हे त्याकडे गेले असता त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ करून आईला चपलेने मारहाण केली आहे.अशा आशयाची फिर्याद संबधित महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात नुकतीच दाखल केली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलीसांनी या आरोपी विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.२०३/२०२२ भा.द.वि.कलम ३५४,(अ),३२४,५०४,५०६,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कलम ३(१)(आर),३(१)एस)३(१)डब्ल्यू)(आय)३(२)(व्ही.ए) प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close