गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात सामायिक बांधावरून तुंबळ हाणामारी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील सामायिक बांधावरील झाडे तोडण्याच्या कारणावरून दोन गटात झालेल्या तुंबळ भांडणात काठ्या,दगड व लाथाबुक्यांचा सुकाळ होऊन त्यात फिर्यादी प्रमोद उत्तम फरताळे (वय-२५) हे जखमी झाले असून या गुन्ह्यात त्यांनी आरोपी सुनील भाऊसाहेब गाडे,शीतल रावसाहेब गाडे,प्रमोद भाऊसाहेब गाडे,प्रीतम रावसाहेब गाडे,रावसाहेब रामराव गाडे सर्व रा.चास नळी आदी पाच जणांविरुद्ध गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे चासनळी व कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी प्रमोद फरताळे व आरोपी सुनील गाडे त्याच्यात एक सामायिक बांध आहे.त्यावर काही झाडे असून ती मोठी झाली होती.ती आरोपी व त्यांच्या काही नातलगांनी तोडली होती.त्यावर फिर्यादी यांनी हरकत नोंदवली होती.त्याचा राग येऊन आरोपी सुनील गाडे,शीतल रावसाहेब गाडे,प्रमोद भाऊसाहेब गाडे,प्रीतम रावसाहेब गाडे,रावसाहेब रामराव गाडे सर्व रा.चास नळी आदीनीं दि.०१ मे रोजी सकाळी ०८ वाजेच्या लाठ्या-काठ्या व दगडाने मारहाण करून फिर्यादिस जखमी केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी प्रमोद फरताळे हे चासनळी येथील रहिवासी असून त्यांच्या शेतीचा व्यवसाय आहे.त्यांच्याशी शेजारी आरोपी सुनील गाडे यांची शेती आहे.त्याच्यात एक सामायिक बांध आहे.त्यावर काही झाडे असून ती मोठी झाली होती.ती आरोपी सुनील गाडे व त्यांच्या काही नातलगांनी तोडली होती.त्यावर फिर्यादी यांनी हरकत नोंदवली होती.त्याचा राग येऊन आरोपी सुनील गाडे,शीतल रावसाहेब गाडे,प्रमोद भाऊसाहेब गाडे,प्रीतम रावसाहेब गाडे,रावसाहेब रामराव गाडे सर्व रा.चास नळी आदीनीं दि.०१ मे रोजी सकाळी ०८ वाजेच्या सुमारास बांबूच्या काठ्या,दगड व लाथा बुक्यांनी यांचा मारा करत फिर्यादी प्रमोद फरताळे यांना मारहाण केली होती.त्यात ते गंभीर जखमी झाले आहे.त्यामुळे फिर्यादी यांनी या पाच जणांविरुद्ध गुन्हा कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात पोलिसांनी गु.क्रं.१५२/२०२२ भा.द.वि.कलम ३२४ ,३२४,५०४,५०६,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे दाखल केला आहे.पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉ.बोठे हेकरित आहेत.