जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव तालुक्यात एकाचा मृत्यू,अकस्मात मृत्यूची नोंद दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात चासनळी येथील बाजार तळ येथे उत्तम भिवसेंन माळी (वय-५५) रा.महालखेडा ता.येवला या इसमाचे निधन झाले असून त्यास उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौन्दर यांनी त्यास मृत घोषित केले आहे.

गुरुवार दि.२८ एप्रिल हा दिवस अपवाद ठरला असून या दिवशी आठवडे बाजारासाठी आलेला महालखेडा ता.येवला येथील इसम उत्तम माळी हा आठवडे बाजार आटोपतानाच काही तरी अज्ञात कारणामुळे निधन पावला होता.त्याला नजीकच्या ग्रामस्थांनी तातडीने उपचार्थ आधी चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथिल उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास मृत घोषित केले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील शेतकरी गाडे येथील शेतात सदर मयत शेती काम करत असत त्या गावात आठवडे बाजार प्रत्येक गुरुवारी भरत असतो त्यासाठी कोपरगाव तालुका व सिन्नर व निफाड व येवला तालुक्यातील सीमावर्ती भागातील ग्रामस्थ या ठिकाणी आठवडे बाजारासाठी येत असतात.त्या ठिकाणी आठवडे बाजार केल्या नंतर ते आपल्या घरी जात असतात.मात्र गुरुवार दि.२८ एप्रिल हा दिवस अपवाद ठरला असून या दिवशी शेती कामास तात्पुरत्या मजुरी कामासाठी आलेला इसम रा.महालखेडा ता.येवला येथील इसम उत्तम माळी हा आठवडे बाजार आटोपतानाच हा आलेल्या हृदय विकाराच्या धक्क्याने निधन पावला होता.त्याला नजीकच्या ग्रामस्थांनी तातडीने उपचार्थ आधी चासनळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता तेथिल उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यास कोपरगाव येथिल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दखल करण्याचा सल्ला दिला होता.त्यानुसार त्यास त्याच दिवशी कोपरगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार करणारे डॉक्टर कृष्णा फुलसौन्दर यांनी त्यास मृत घोषित केले आहे.व त्याची खबर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंदणी क्रं.३०/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ अन्वये दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याचे मार्गदर्शनाखाली पोलीस हे.कॉ.बोठे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close