कोपरगाव तालुका
कोपरगावातील…हे नेते आपल्या समाजकार्याने अजरामर झाले-देहूकर महाराज

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संत ज्ञानेश्वरांना अवघे २२ वर्ष,जगद्गुरू तुकाराम महाराज ४१ वर्ष,१ महिना १७ दिवस,छत्रपती शिवाजी महराजांना ५१ वर्ष,स्वामी विवेकानंदांना ३१ वर्ष आयुष्य मिळाले मात्र आजही शेकडो वर्षांनंतर ते किर्तीरुपाने आपल्यात आहेत.तद्वत कर्मवीर शंकरराव काळे हे देखील आपल्या समाजकार्याने अजरामर झाले असून त्यांच्या स्मृतिगंध आजही दरवळत असल्याचे प्रतिपादन संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. बापूसाहेब महाराज देहूकर यांनी गौतमनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना स्व.यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला.शरद पवार यांच्या सोबत त्यांनी काम केले.त्यांनी माणसाला माणूंस जोडून उभा केलेला साखर कारखाना व उद्योग समूहामुळे परिसर समृद्ध झाला.संसारात रंजल्या,गांजल्याचे दु:ख कमी करण्याचे काम संत महात्मे करतात.साखर कारखान्याच्या उभारणीतून शेतकऱ्यांना सुखी केले होते”-बापूसाहेब महाराज देहूकर.
कोपरगाव तालुक्यात शिक्षण,सहकार,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्य कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक,माजी खा.स्व.कर्मवीर शंकरराव काळे यांच्या १० व्या पुण्यस्मरणा निमित्त कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यानात आयोजित कीर्तनरूपी सेवेप्रसंगी ह.भ.प.बापूसाहेब महाराज देहूकर बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवन,उपाध्यक्ष नारायणराव मांजरे,संभाजी काळे,बाळासाहेब कदम,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,बबनराव कोळपे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,डॉ.मच्छिंद्रनाथ बर्डे,सचिन चांदगुडे,दिनार कुदळे,सचिन रोहमारे,मीननाथ बारगळ,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे,आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे,सेक्रेटरी बाबा सय्यद,सहाय्यक सचिव एस.डी.शिरसाठ,आदी प्रमुख मान्यवरांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांना स्व.यशवंतराव चव्हाण,वसंतदादा पाटील,कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास लाभला.शरद पवार यांच्या सोबत त्यांनी काम केले.काळे परिवारावर संत वाडमयाच्या विचारांचा पगडा होता हे त्यांच्या विचारातून दिसून येते.त्यांनी माणसाला माणूस जोडून उभा केलेला साखर कारखाना व उद्योग समूहामुळे परिसर समृद्ध झाला.संसारात रंजल्या,गांजल्याचे दु:ख कमी करण्याचे काम संत महात्मे करतात.साखर कारखान्याच्या उभारणीतून शेतकऱ्यांना सुखी करून त्यांच्या शेतकरी,कष्टकरी व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी केलेले काम संता प्रमाणेच आहे.आणि हेच काम आजही माजी आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आ.आशुतोष काळे यांच्या रूपाने त्यांची तिसरी पिढी करीत आहे.यावरून शुद्ध बीजापोटी,फळे रसाळ गोमटी या संतवचनाची अनुभूती येत असल्याचे प्रतिपादन केले आहे.
दोन पिढ्यापासून सुरु असलेले समाजकार्य तिसरी पिढी चालवित आहे हे सहसा घडत नाही मात्र ज्याप्रमाणे वाढत जाणाऱ्या अमृताच्या वेलावर अमृताचेच फळ लागते त्याप्रमाणे काळे परिवाराच्या अमृत वेलीवरील आ.आशुतोष काळे हे मधुर फळ आहे व त्यांच्या हातून देखील काळे परिवाराचा समाजकारणाचा वारसा समर्थपणे पुढे चालविला जात असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. देहूकर यांनी शेवटी केले आहे.