कोपरगाव तालुका
जनतेचे प्रश्न सोडविण्यात लोकप्रतिनिधींना रस नाही-काळेंची टीका
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील प्रश्न सोडविण्यात तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना अजिबात रस नसल्याची टीका कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील कर्मवीर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यानी आ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता नुकतीच एका कार्यक्रमात बोलताना केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र निधीमधून १० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ११० शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना काळे यांच्या हस्ते सायकल वाटपकरण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन होत्या.
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी देवस्थानच्या ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र निधीमधून १० लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या उद्यानाचे लोकार्पण तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने ११० शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना काळे यांच्या हस्ते सायकल वाटपकरण्यात आले
याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, संचालक आनंदराव चव्हाण, सचिन रोहमारे, पंचायत समितीचे उपसभापति अनिल कदम, जि.प.सदस्या सोनाली रोहमारे, सोनाली साबळे, पंचायत समिती सदस्य अर्जुन काळे, मधुकर टेके, श्रावण आसने, पोर्णिमा जगधने, तसेच मधुकर होन, रोहिदास होन, नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, पाटीलबा वक्ते, दिलीप शिंदे, शंकरराव चव्हाण, मच्छिंद्र रोहमारे, राजेंद्र पगारे, राहुल रोहमारे, अर्जुन वेताळ, शांतीलाल पवार, डॉ.गोरक्षनाथ रोकडे, सुधाकर होन, संतोष पवार, जनार्दन पवार, देर्डेचे सरपंच योगीराज देशमुख, मढीच्या सरपंच वैशाली आभाळे, डाऊच खु. चे सरपंच संजय गुरसळ, नारायण होन, पोलीस पाटील मीरा रोकडे, प्रभूशंकर होन, केशव जावळे, शिवाजी जाधव, शांतीलाल पवार, वैशाली खकाळे, सुनील होन, सौ. वंजुताई होन, रावसाहेब होन, भैय्यासाहेब शेख, पंकज पुंगळ, गटविकास अधिकारी पंडीत वाघिरे, डी.ओ. रानमाळ, विस्तार अधिकारी सुनिल माळी, मुख्याध्यापक शेख, शिवाजी बर्डे आदी मान्यवरांसह ग्रामस्थ बहू संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,मागील पाच वर्षापासून जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सातत्याने आवाज उठविला आहे. त्यासाठी आंदोलने केली, आमरण उपोषण केले व वेळप्रसंगी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात गेलो आहे. त्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेने विश्वास दाखवून पंचायत समिती व जिल्हा परिषदेची सत्ता दिली. स्व. सुशीलामाई काळे यांनी नेहमीच माजी.खा.काळे यांच्याकडे मुलींच्या शिक्षणासाठी शाळा- महाविद्यालये सुरु करण्याचा आग्रह धरल्यामुळे त्यांनी महिला महाविद्यालये सुरु केली. आजही सायकल वाटप कार्यक्रमात मुलींची संख्या जास्त असून मुलींच्या शिक्षणाचा उद्देश साध्य होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी चांगली गुणवत्ता प्राप्त करून आपल्या शाळेचे, गावाचे व आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करावे असे आवाहन शेवटी केले आहे.
सदर प्रसंगी जेष्ठ नेते अशोक रोहमारे म्हणाले की,स्वतः ला शिक्षण सम्राट व सहकार सम्राट म्हणवून घेणार्यांना आजपर्यंत त्यांचे कारखाने कर्ज मुक्त करता आले नाही अशी टीका केली.
पंचायत समितीच्या सभापती अनुसया होन म्हणाल्या की,तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांपर्यत योजनांचा लाभ पोहोचत असून सर्व सहकारी सदस्यांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहे. तसेच चांदेकसारे गावातील १०५ शौचालय लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी बारा हजार याप्रमाणे बारा लाख साठ हजार रुपये जमा झाले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुधाकर होन यांनी केले तर सूत्रसंचलन श्री पाटील यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार संजय लाला होन यांनी मानले.